प्रियांकाचा उपवास, बायकोला उपाशी पाहून अस्वस्थ झाला निक, केला असा पराक्रम... जगभरात होतेय चर्चा
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Priyanka Chopra-Nick Jonas: निक जोनसने प्रियांकासाठी केलेला एक रोमँटिक पराक्रम सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.
advertisement
नुकताच नेटफ्लिक्सवर 'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा चौथा सीझन सुरू झाला असून, या सीझनची पहिली पाहुणी ठरली ती म्हणजे प्रियांका चोप्रा! या शोमध्ये प्रियांकाने आपल्या वैयक्तिक आयुष्यातील असे काही खुलासे केले की, खुद्द कपिल शर्माही चकित झाला. विशेषतः पती निक जोनसने प्रियांकासाठी केलेला एक रोमँटिक पराक्रम सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.
advertisement
advertisement
advertisement
प्रियांकाने त्या रात्रीची आठवण सांगताना म्हटलं, "एका वर्षी करवा चौथ होता आणि निकचा एका मोठ्या स्टेडियममध्ये कॉन्सर्ट सुरू होता. तिथे जवळपास ६० ते ७० हजार लोक जमले होते. १० वाजले, ११ वाजले, पण आकाशात चंद्र काही दिसेना. मुळात तेव्हा ढगाळ वातावरण होतं आणि पाऊस पडण्याची चिन्हं होती. मी भुकेली होते आणि चंद्राची वाट पाहत होते, पण ढगांमुळे तो दिसतच नव्हता."
advertisement
advertisement
advertisement
advertisement
कपिल शर्माच्या शोमध्ये प्रियांकाने केवळ हाच नाही, तर निकसोबतच्या संसारातील अनेक मजेशीर किस्से सांगितले. सध्या प्रियांका तिच्या आगामी हॉलिवूड प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त आहे, पण भारताप्रती आणि इथल्या सणांप्रती तिचं प्रेम पाहून चाहते पुन्हा एकदा तिच्या प्रेमात पडले आहेत. निक जोनसने ज्या पद्धतीने भारतीय सणांचा आदर केला आहे, त्याचंही कौतुक होत आहे.










