'धुरंधर'च्या क्रेझला बसला ब्रेक? नव्या फिल्मचा जगभरात डंगा, पहिल्याच आठवड्यात पार केला 800 कोटींचा टप्पा
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Dhurandhar Box Office Collection: भारतीय बॉक्स ऑफिसवर सध्या एका देशी वादळाने सगळ्यांनाच गारद केलंय, ते नाव म्हणजे 'धुरंधर'! मात्र, याच आठवड्यात रिलीज झालेल्या नव्या फिल्मने मोठी कमाई केली आहे.
advertisement
advertisement
advertisement
दोन दिवसांत या चित्रपटाने भारतात ४३ कोटींची कमाई केली असून, पहिल्या विकेंडला हा आकडा ६५ ते ७० कोटींच्या घरात जाण्याची शक्यता आहे. रविवारी दुपारपर्यंतच्या आकडेवारीनुसार, चित्रपटाने आणखी ६.५३ कोटींची भर घातली असून एकूण कमाई ४७.८८ कोटींवर पोहोचली आहे. जरी हे आकडे ऐकायला मोठे वाटत असले, तरी 'अवतार'च्या ब्रँड व्हॅल्यूला पाहता हे अपेक्षेपेक्षा कमी आहेत.
advertisement
advertisement
advertisement
भारतात जरी संघर्ष सुरू असला, तरी जागतिक स्तरावर जेम्स कॅमेरूनचा करिष्मा अजूनही कायम आहे. जगभरात या सिनेमाने १०० दशलक्ष डॉलर्सचा म्हणजेच सुमारे ८३० कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. भारतात इंग्रजी भाषेत या चित्रपटाला ३१ टक्के ऑक्युपन्सी मिळाली असून, हिंदी पट्ट्यातही संथ पण स्थिर प्रतिसाद मिळत आहे.
advertisement
आता येणाऱ्या ख्रिसमस आणि न्यू इयरच्या सुट्ट्यांमध्ये चित्र अधिक स्पष्ट होईल. जर या सुट्ट्यांमध्ये फॅमिली ऑडिअन्सने थिएटर्समध्ये गर्दी केली, तरच हा चित्रपट भारतातील 'टॉप ७ हॉलिवूड मूव्हीज'च्या यादीत स्थान मिळवू शकेल. 'धुरंधर'च्या लाटेसमोर 'अवतार'चा हे Fire and Ash तग धरून राहतो का, हे पाहणं आता रंजक ठरेल.










