Soham-Pooja : 'त्या बिचाऱ्याची मला दया येते' लग्नानंतर थाटला वेगळा संसार, आता सोहमबद्दल पूजाचं शॉकिंग वक्तव्य
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Soham Bandekar-Pooja Birari: २ डिसेंबर २०२५ रोजी लोणावळ्याच्या निसर्गरम्य वातावरणात सोहम बांदेकर आणि पूजा बिरारी यांनी लग्नगाठ बांधली. लग्नानंतर अवघ्या काही दिवसांतच पूजाने एक असा खुलासा केला आहे, जो ऐकून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
advertisement
advertisement
advertisement
लग्नानंतर मुलीच्या आयुष्यात मोठे बदल होतात, असं आपण नेहमी ऐकतो. पण पूजा बिरारीचं मत जरा हटके आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत पूजा म्हणाली, "लग्नानंतर माझ्या आयुष्यात फार मोठा बदल झालाय असं मला वाटत नाही. कारण मी लग्नाआधीपासूनच मुंबईत एकटी राहत होते, स्वतःचं घर सांभाळत होते. उलट आता मला आनंद आहे की, मला आयुष्यभरासाठी एक हक्काचा रुममेट मिळाला आहे."
advertisement
पूजाच्या मते, या लग्नानंतर खरा बदल सोहमच्या आयुष्यात झाला आहे. ती गंमतीने म्हणाली, "खरं तर मला सोहमची दया येते, कारण तो त्याचं हक्काचं घर सोडून माझ्यासोबत राहायला आलाय. आम्ही दोघांनी आमच्या कामाच्या ठिकाणापासून जवळ पडेल असं एक नवीन घर पाहिलं आहे. त्यामुळे घरापासून दूर राहण्याचा जो स्ट्रगल मुलींना करावा लागतो, तो सध्या सोहम करतोय!"
advertisement
advertisement
advertisement
advertisement









