Eknath Shinde: राज्यभरातल्या विजयाने दिवस गोड गेला पण २ पराभव एकनाथ शिंदे यांच्या जिव्हारी लागणारे
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Eknath Shinde Shiv Sena: अंबरनाथमध्ये ठाकरेंना भोपळाही फोडता आला नाही. तर बदलापूर नगर परिषदेवरही भाजपची सत्ता आली असून शिवसेनेच्या २५ वर्षांच्या गडाला भाजपने सुरूंग लावला आहे.
ठाणे : एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यातील बदलापूर आणि अंबरनाथ नगर परिषद निवडणूक निकालाकडे राज्याचे लक्ष लागून राहिले होते. मात्र शिवसेनेचा गड उद्ध्वस्त करीत भाजपने दमदार कामगिरी केली. विशेष म्हणजे मनसे-शिवसेनेने एकत्र येऊन भाजपला रोखण्याचा रोखण्याचा प्रयत्न केला परंतु अंबरनाथकरांनी ठाकरे ब्रँड सपशेल नाकारला. अंबरनाथमध्ये ठाकरेंना भोपळाही फोडता आला नाही. तर बदलापूर नगर परिषदेवरही भाजपची सत्ता आली असून शिवसेनेच्या २५ वर्षांच्या गडाला भाजपने सुरूंग लावला आहे.
advertisement
राज्यातील नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने अपेक्षेप्रमाणे शंभरी ओलांडली. दुसरीकडे महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या शिंदेसेना आणि अजित पवार यांनीही जवळपास अर्धशतक गाठले. राज्यात शिंदेसेनेचा जिकडे भाजपशी अटीतटीचा सामना झाला, तिकडच्या जागा राखण्यात एकनाथ शिंदे यांच्या सेनेला यश मिळाले. परंतु एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या ठाणे मतदारसंघातील अंबरनाथ आणि बदलापूर राखण्यात यश न आल्याने एकनाथ शिंदे यांना शेवटचा घास कडू लागला.
advertisement
अंबरनाथमध्ये शिवसेना-भाजपचा गड आला पण सिंह गेला
अंबरनाथमध्ये नगर परिषदेचे एकंदर चित्र पाहिले असता शिवसेना-भाजपची अवस्था गड आला पण सिंह गेला अशी झाली. शिवसेनेचे नगरसेवक जास्त निवडून आले तर नगराध्यक्ष पराभूत झाला. तर भाजपचा नगराध्यक्ष जिंकला पण नगरसेवक कमी निवडून आले.
ठाकरे ब्रँड अंबरनाथकरांनी नाकारला
अंबरनाथमध्ये ठाकरेंना भोपळाही फोडता आला नाही. मनसेचे ११ उमेदवार ठाकरे सेनेच्या मशाल चिन्हावर उभे होते. परंतु मनसे ठाकरे सेनेला एकही जागा जिंकता आली नाही. मुंबई महापालिकेआधी दोन्ही पक्षाला तगडा झटका बसला.
advertisement
अंबरनाथ नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५
थेट नगराध्यक्ष - भाजप
५९ सदस्य पैकी पक्षनिहाय जागा
शिवसेना २७
भाजप १४
काँग्रेस १२
राष्ट्रवादी काँग्रेस ०४
अपक्ष ०२
बदलापूर नगर परिषदेवर भाजपचा झेंडा
बदलापूर नगर परिषदेवर भाजपाची सत्ता आली. नगराध्यक्षपदी भाजपाच्या रुचिता घोरपडे या विजय झाल्या. शिवसेनेच्या २५ वर्षाच्या सत्तेला भाजपने सुरुंग लावला. गेल्या पंचवीस वर्षापासून बदलापूर नगर परिषदेवर शिवसेनेची सत्ता होती. असे असतानाही भाजपाने नगरपरिषदेवर कमळ फुलवले. शिवसेना आणि भाजपने नगर परिषदेची निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची केली होती. या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत भाजपने बाजी मारली.
advertisement
अंबरनाथ नगरपरिषदेत शिवसेनेच्या पराभवाची १० कारणे
१) मतदानाच्या अवघ्या ४८ तास आधी अंबरनाथमध्ये गोळीबार झाला, त्याचा फटका थेट नगराध्यक्षपदाच्या मतांमध्ये बसला
२) अंबरनाथमध्ये वाळेकर कुटुंबीयांची असलेली दहशतीचे भांडवल करत विरोधक भाजपने निवडणूक प्रचार केला
३) भाजप शिवसेना यांच्या युतीतला वाद म्हणून अंबरनाथमध्ये शिवसेनेला भाजपच्या रूपाने पर्याय मिळाला
४) शिवसेनेचे अंबरनाथ शहर प्रमुख तसेच माजी नगराध्यक्ष अरविंद वाळेकर त्यांचा मुलगा निखिल वाळेकर यांचा अति आत्मविश्वास
advertisement
५) अंबरनाथमधील व्यापारी संघाने शेवटच्या क्षणी भाजपला दिलेली साथ
६) जर अंबरनाथमध्ये शिवसेनेने नगराध्यक्ष पदाकरीता वाळेकर कुटुंबीय सोडून इतर चेहरा दिला असता तर अंबरनाथमध्ये शिवसेनेला नगराध्यक्ष पदाचा गड राखता आला असता असे बोलले जाते.
७) प्रचार करीता मिळालेला वाढीव वेळ शिवसेनेने चांगला उपयोगी आणला पण तो फक्त नगरसेवकांच्या पत्थ्यावर पडला. नगराध्यक्षपदासाठी मात्र आत्मविश्वास नडला.
advertisement
८) अंबरनाथमध्ये प्रचार करता मिळालेल्या वाढीव वेळेचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योग्य वेळेत अंबरनाथमध्ये प्रचार सभा घेतल्याने भाजपला नगराध्यक्ष पदाकरता थेट फायदा झाला
९) शिवसेनेचे नगरसेवक पदाचे उमेदवार प्रचारात जोर मारत होते. मात्र नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मनीषा वाळेकर आणि वाळेकर कुटुंबीय मात्र प्रचारावर जास्त भर देत होते.
१०) वाळेकर हे नाव अंबरनाथ मध्ये रक्तरंजित गुंडगिरी म्हणून कुप्रसिद्ध आहे तर याचाच फायदा घेत भाजपने चार्टर्ड अकाउंटंट आणि तरुण उमेदवार दिल्याने त्याचा फायदा भाजपला झाला
Location :
Thane,Maharashtra
First Published :
Dec 21, 2025 8:03 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Eknath Shinde: राज्यभरातल्या विजयाने दिवस गोड गेला पण २ पराभव एकनाथ शिंदे यांच्या जिव्हारी लागणारे









