Vaibhav Suryavanshi : 'तू माझ्या पायाची धूळ...', वैभव सूर्यवंशी पहिल्यांदाच इतका भडकला, पाकिस्तानी बॉलरशी नडला, Video
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
अंडर 19 आशिया कप 2025 च्या फायनलमध्ये पाकिस्तानने टीम इंडियाचा 191 रननी पराभव केला आहे. पाकिस्तानने दिलेलं 348 रनचं आव्हान पार करण्यासाठी आलेल्या भारताचा फक्त 156 रनवर ऑलआऊट झाला.
मुंबई : अंडर 19 आशिया कप 2025 च्या फायनलमध्ये पाकिस्तानने टीम इंडियाचा 191 रननी पराभव केला आहे. पाकिस्तानने दिलेलं 348 रनचं आव्हान पार करण्यासाठी आलेल्या भारताचा फक्त 156 रनवर ऑलआऊट झाला. एवढ्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या टीम इंडियाची सुरूवात अत्यंत खराब झाली. कर्णधार आयुष म्हात्रे 2 रनवर आऊट झाला, त्यानंतर ऍरॉन जॉर्ज 16 रनवर पॅव्हेलियनमध्ये गेला.
सुरूवातीच्या 2 विकेट लवकर गेल्यानंतर टीम इंडियाला वैभव सूर्यवंशीकडून अपेक्षा होत्या, पण 10 बॉलमध्ये 26 रन करून वैभव आऊट झाला. अली रझाच्या बॉलिंगवर हमझा झहूरने वैभवचा कॅच पकडला. वैभवची विकेट घेतल्यानंतर पाकिस्तानचा बॉलर अली रझाने जोरदार सेलिब्रेशन केलं, पण हे सेलिब्रेशन पाहून वैभव चांगलाच संतापला.
Vaibhav Suryavanshi just following his seniors #INDvsPAK
pic.twitter.com/Y7BqLmhc6D
— Sarcasm (@sarcastic_us) December 21, 2025
advertisement
पाकिस्तानी खेळाडूंनी केलेलं सेलिब्रेशन वैभव सूर्यवंशीला आवडलं नाही, यानंतर त्याने पाकिस्तानच्या टीमला पाहून इशारा केला, जो आता वादात सापडला आहे. तुम्ही माझ्या पायाची धूळ असल्याचा इशारा वैभवने पाकिस्तानी खेळाडूंना पाहून केला. वैभवच्या या कृतीवरून काही चाहत्यांनी त्याच्यावर नाराजी व्यक्त केली आहे. कामगिरी शून्य आणि अॅटिट्यूड 100 अशा प्रतिक्रिया चाहत्यांनी वैभवच्या या व्हिडिओकडे पाहून केल्या आहेत.
advertisement
वैभव सूर्यवंशीने त्याच्या इनिंगमध्ये एक फोर आणि 3 सिक्स मारल्या, पण त्याला मोठा स्कोअर करता आला नाही. वैभव सूर्यवंशीच्या आधी टीम इंडियाचा कर्णधार आयुष म्हात्रे याचाही पाकिस्तानी खेळाडूंसोबत पंगा झाला. वैभवच्या आधी अली रझाने आयुष म्हात्रेचीही विकेट घेतली, तेव्हाही आयुष म्हात्रे आणि अली राझा यांच्यात राडा झाला. आयुष म्हात्रेने अली रझाला पाहून अपशब्द वापरले, याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 21, 2025 7:55 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Vaibhav Suryavanshi : 'तू माझ्या पायाची धूळ...', वैभव सूर्यवंशी पहिल्यांदाच इतका भडकला, पाकिस्तानी बॉलरशी नडला, Video











