'त्यांना माझ्या बम्स आणि ब्रेस्ट्सवर...' फिल्ममेकरची डिमांड ऐकून शॉक झालेली मराठमोळी अभिनेत्री, धक्क्याने आजही रडते
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Actress Horrifying Experience on Film set: बॉलिवूडची बोल्ड आणि ब्युटीफुल अभिनेत्री सध्या तिच्या अभिनयापेक्षा एका धक्कादायक खुलाशामुळे चर्चेत आली आहे.
मुंबई: बॉलिवूडची बोल्ड आणि ब्युटीफुल अभिनेत्री राधिका आपटे सध्या तिच्या अभिनयापेक्षा एका धक्कादायक खुलाशामुळे चर्चेत आली आहे. राधिका म्हणजे पडद्यावर बेधडकपणे वावरणारी अभिनेत्री, पण याच राधिकाने तिच्या करिअरच्या सुरुवातीला जे काही सोसलंय, ते ऐकून कोणत्याही महिलेच्या अंगावर काटा येईल. दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील काही दिग्दर्शकांच्या अश्लील मागण्यांबद्दल बोलताना राधिकाचा आजही थरकाप उडतो.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
राधिकाने त्या काळच्या असुरक्षिततेबद्दल बोलताना म्हटलं की, "मी तिथे एकटीच स्त्री होते. निर्मात्यांनी मला स्वतःची टीम आणू दिली नव्हती. माझ्या टीममध्येही सगळे पुरुषच होते, कारण त्यांनीच मला कामावर ठेवलं होतं. अशा वातावरणात काम करताना जो मानसिक त्रास झाला, तो ट्रॉमेटिक होता. मला कधीही अशा परिस्थितीत पुन्हा अडकायचं नाहीये, कारण ते आठवलं की मला रडू येईल."
advertisement
advertisement
सध्या राधिका आपटे ही तिच्या 'धुरंधर' सिनेमाशी संबंधित काही वक्तव्यांमुळेही चर्चेत आहे. पण या वादाच्या पलीकडे जाऊन तिने मांडलेलं हे वास्तव सिनेसृष्टीतील काळ्या बाजूवर प्रकाश टाकणारं आहे. राधिकाने आजवर 'पार्च्ड', 'फोबिया' आणि अलीकडेच आलेल्या टिस्का चोप्राच्या 'साली मोहब्बत' मधून आपल्या अभिनयाची ताकद दाखवून दिली आहे.









