इंदापुरात हर्षवर्धन पाटलांच्या साथीच्या जोरावर अजितदादांना थेट चॅलेंज दिलेल्या गारटकरांचं काय झालं? संपूर्ण निकाल
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Indapur Nagar Parishad Election Results: अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून भरत शेठ शहा विरुद्ध हर्षवर्धन पाटील यांच्या स्थानिक आघाडीकडून राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिलेले प्रदीप गारटकर निवडणूक लढवत होते.
इंदापूर : इंदापूर नगरपरिषदेच्या अटीतटीच्या झालेल्या निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. दहा प्रभागासाठी झालेल्या निवडणुकीत २० जागांसाठी ५६ उमेदवार रिंगणात होते. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे १५ सदस्य निवडून आले. तर कृष्णा भीमा विकास आघाडीचे ५ नगरसेवक निवडून आले. नगराध्यक्षपदाच्या लढतीत देखील अजित पवार यांच्या पॅनलने बाजी मारली.
पुणे जिल्ह्यात इंदापूर नगरपरिषद निवडणूक सगळ्यात जास्त चुरशीची मानली गेली. कारण कट्टर प्रतिस्पर्धी दत्ता भरणे विरुद्ध हर्षवर्धन पाटील यांच्या पॅनेलमध्ये काँटे की टक्कर झाली . अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून भरत शेठ शहा विरुद्ध हर्षवर्धन पाटील यांच्या स्थानिक आघाडीकडून राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिलेले प्रदीप गारटकर निवडणूक लढवत होते. जनतेतून नगराध्यक्ष आणि १० प्रभागांमधून २० नगरसेवक निवडले गेले. मतदारांनी दत्ता भरणे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला.
advertisement
निवडणुकीआधी प्रदीप गारटकरांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली होती
इंदापूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी न दिल्याने अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन गारटकर यांनी इंदापुरात शड्डू ठोकला. मित्राचा शत्रू तो आपला मित्र हे समीकरण लक्षात घेऊन हर्षवर्धन पाटील यांनी गारटकर यांना पाठिंबा दिला. मात्र प्रदीप गारटकर यांनी अजित पवार यांची साथ सोडल्याचे जनतेला रुचले नाही. १२७ मतांनी गारटकर यांचा पराभव झाला. राष्ट्रवादीचे भरतशेठ शहा हे इंदापूरचे नगराध्यक्ष म्हणून निवडून आले.
advertisement
राजकीय हाडवैर विसरून एकत्र पण मामा-दादांनी डाळ शिजू दिली नाही
शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने कृष्णा भीमा आघाडीला पाठिंबा दिला होता. प्रदीप गारटकर हे आघाडीचे उमेदवार होते. मागील अनेक निवडणुकीत हर्षवर्धन पाटील, प्रदीप गारटकर आणि प्रवीण माने हे नेते एकमेकांचे विरोधक होते. मात्र या निवडणुकीत तिघांनीही राजकीय हाडवैर विसरून एकत्र येऊन अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला आव्हान दिले होते.
advertisement
इंदापूर नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये विजयी झालेल्या नगरसेवकांची नावे पुढीलप्रमाणे-
नगराध्यक्ष पदाचे विजयी उमेदवार भरत सुरेशदास शहा (अजित पवार यांची राष्ट्रवादी)
राष्ट्रवादी काँग्रेस विजयी उमेदवार-
प्रभाग १ अ उमेश रमेश मखरे
१ ब सुनीता अरविंद वाघ
प्रभाग २ अ सुनीता अमर नलवडे
प्रभाग ३ अ वंदना भारत शिंदे
प्रभाग ४ ब शकील मकबूल सय्यद
advertisement
प्रभाग ५ अ दिप्ती स्वप्निल राऊत
प्रभाग ५ ब अक्षय शंकर सुर्यवंशी
प्रभाग ६ अ शुभम पोपट पवार
प्रभाग ७ ब मयूरी प्रशांत उंबरे
प्रभाग ८ अ सागर सुनील आरगडे
प्रभाग ८ ब रजिया हजरत शेख
प्रभाग ९ अ शोभा सुरेश जावीर
प्रभाग ९ ब शैलेश देविदास पवार
प्रभाग १० अ - अनिता अनिल ढावरे
advertisement
हर्षवर्धन पाटील यांची कृष्णा भीमा विकास आघाडी विजयी उमेदवारांची यादी
प्रभाग २ ब अनिल सुदाम शिंदे
प्रभाग ३ ब गणेश नंदकुमार राऊत
प्रभाग ४ अ शकिला खाजा बागवान
प्रभाग ६ ब शीतल अतुल शेटे
प्रभाग ७ अ सदफ वशीम बागवान
प्रभाग १० ब सुधाकर संभाजी ढगे
view commentsLocation :
Indapur,Pune,Maharashtra
First Published :
Dec 21, 2025 6:48 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
इंदापुरात हर्षवर्धन पाटलांच्या साथीच्या जोरावर अजितदादांना थेट चॅलेंज दिलेल्या गारटकरांचं काय झालं? संपूर्ण निकाल









