Palghar Nagar Parishad: पालघरमध्ये भाजपचं स्वप्न भंगलं, पालघरसह डहाणू नगरपरिषदेवर शिंदेसेनेचाच भगवा
- Published by:Prachi Amale
Last Updated:
डहाणू आणि पालघर नगरपरिषद भाजपच्या हातून निसटल्या आहेत. या दोन्ही नगरपरिषदांवर शिवसेनेने मोठ्या मताधिक्याने विजय प्राप्त केला आहे.
Palghar Nagar parishad election Result 2025: शिंदे सेनेचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या पालघर जिल्ह्यातील पालघर आणि डहाणू या दोन्ही नगरपरिषदांवर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने भाजपला जोरदार धक्का दिला आहे. पालघरमध्ये नगरपरिषदेच्या एकूण 4 जागा होत्या. त्या जागापैकी 2 जागा भाजपने मिळवत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 2 जागा मिळवल्या आहेत.
पालघर जिल्ह्यात भाजपकडून मंत्री गणेश नाईक , खासदार हेमंत सावरा आणि जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. तर दुसऱ्या बाजूला शिवसेना शिंदे गटाकडून एकनाथ शिंदे यांच्यासह माजी आमदार रवींद्र फाटक आणि जिल्हाप्रमुख कुंदन संखे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती . पालघर नगरपरिषद हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला असला तरी शिवसेना पक्ष फुटीनंतर हा बालेकिल्ला भाजपने खेचण्याचा प्रयत्न केला. जिल्ह्यामधील जव्हार आणि वाडा नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदावर भाजपचे उमेदवार निवडून आले असले तरी महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या डहाणू आणि पालघर नगरपरिषद भाजपच्या हातून निसटल्या आहेत. या दोन्ही नगरपरिषदांवर शिवसेनेने मोठ्या मताधिक्याने विजय प्राप्त केला आहे.
advertisement
पालघरमध्ये पक्षीय बलाबल काय आहे?
जव्हार नगरपरिषद एकूण जागा 20
- भाजप 14
- शिवसेना शिंदे 2
- अजित पवार राष्ट्रवादी 3
- शरद पवार राष्ट्रवादी 1
पालघर नगर परिषद एकूण जागा 30
- शिवसेना शिंदे गट 19
- भाजप 8
- ठाकरे शिवसेना 3
वाडा नगरपंचायत एकूण जागा 17
- भाजप 10
- शिवसेना शिंदे 3
- ठाकरेंची शिवसेना 1
- अजित पवार राष्ट्रवादी 1
- शरद पवार राष्ट्रवादी 1
- काँग्रेस 1
advertisement
डहाणू नगर परिषद एकूण जागा 27
- भाजप. 17
- शिवसेना शिंदे 2
- राष्ट्रवादी शरद पवार 8
| जिल्हा | नगरपरिषद / नगरपंचायत | विजयी उमेदवारांचे नाव | पक्ष |
| पालघर | डहाणू | राजेंद्र माच्छी (शिंदे गट) | शिवसेना |
| पालघर | जव्हार | पुजा उदान | भाजप |
| पालघर | पालघर | उत्तम भरत | शिवसेना |
| पालघर | वाडा | रिमा कंधे | भाजप |
advertisement
Location :
Thane,Maharashtra
First Published :
Dec 21, 2025 6:38 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Palghar Nagar Parishad: पालघरमध्ये भाजपचं स्वप्न भंगलं, पालघरसह डहाणू नगरपरिषदेवर शिंदेसेनेचाच भगवा








