Nagar Parishad Election : नगराध्यक्ष झाले त्यांना आता किती पगार मिळणार?

Last Updated:
Maharashtra Nagar Parishad Election : राज्यात नगर परिषद, नगरपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या. नगराध्यक्ष निवडून आले आहेत. यांना आता किती पगार मिळणार हे तुम्हाला माहिती आहे का? 
1/7
राज्यात नगर परिषद, नगरपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या. नगराध्यक्ष निवडून आले आहेत. त्यांचा विजय साजरा केला जातो आहे. पण आता नगराध्यक्ष झालेल्यांना किती पगार मिळतो हे तुम्हाला माहिती आहे का?

advertisement
2/7
नगराध्यक्षांना पगार मिळत नाही तर त्यांना मानधन मिळतं. शासन निर्णय - महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती आणि औद्योगिक नगरी अधिनियम, 1965 मधील कलम 61(1) च्या तरतुदीनुसार राज्यातील नगरपरिषदा/नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष यांना दरमहा मानधन आणि दरवर्षी अतिथ्य भत्ता देण्यास मान्यता आहे.

3/7
नगराध्यक्षांना देण्यात येणारं मानधन आणि अतिथ्य भत्ता हा नगरपरिषद फंडातून देण्यात यावा असं शासन निर्णयात सूचित करण्यात आलं आहे. नगरपरिषद फंड म्हणजे पाणीपट्टी, घरपट्टी आणि इतर करांतून जमा झालेला निधी.

4/7
नगराध्यक्षांना मिळणारं मानधन नगरपरिषदेच्या वर्गानुसार वेगवेगळं असतं. अ वर्गातील नगरपरिषदेच्या नगराध्यक्षांना सगळ्यात जास्त मानधन तर क वर्गातील नगरपरिषदेच्या नगराध्यक्षांना कमी मानधन असतं.

5/7
अ वर्ग नगरपरिषद : मानधन - 25000, अतिथ्य भत्ता - 36000, ब वर्ग नगरपरिषद : मानधन - 20000, अतिथ्य भत्ता - 24000, क वर्ग नगरपरिषद : मानधन - 15000, अतिथ्य भत्ता - 18000.

6/7
अतिथ्य भत्ता म्हणजे पाहुण्यांचा आदरातिथ्य करताना होणाऱ्या खर्चासाठी जसं की जेवण, निवास किंवा इतर सोयीसुविधांचा खर्च यासाठी मिळणारी आर्थिक मदत किंवा भरपाई. शिवाय त्यांना ज्यादिवशी मीटिंग आयोजित केली जाते त्यादिवशी 100 रुपये मीटिंग भत्ताही मिळतो.

7/7
दि. 23 ऑगस्ट 2019 रोजी जाहीर शासन निर्णय क्र. एमसीओ- 2019/प्र.क्र. 26/नवि-14 चा हवाला देत महाराष्ट्र शासनात लेखाधिकारी असलेल्या प्रतीक जाधव नावाच्या व्यक्तीने क्वोरावर ही माहिती दिली आहे.

Uddhav Thackeray Raj Thackeray: BMC आधी सर्वात धक्कादायक निकाल, ठाकरे बंधू एकत्र येऊन गणित जमलं नाही, काँग्रेस वेगळं लढल्यानं फायदाच फायदा!
BMC आधी धक्कादायक निकाल, ठाकरे बंधू एकत्र येऊन गणित जमलं नाही, काँग्रेस व
  • BMC आधी धक्कादायक निकाल, ठाकरे बंधू एकत्र येऊन गणित जमलं नाही, काँग्रेस व

View All
advertisement