फडणवीसांची सभा झाली तिथे काँग्रेसची सत्ता, प्रहार-वंचितची दमदार कामगिरी, अमरावतीत अनेकांना हादरे देणारा निकाल

Last Updated:

अमरावतीत अजित पवार आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मात्र खातेही उघडता आलेले नाही

News18
News18
Amravati Nagar Parishad Election अमरावतीमध्येही भाजपने सर्वाधिक जागांवर विजय मिळवलाय. पण येथील चिखलदरा नगरपरिषदमध्ये लोकांनी काँग्रेसला कल दिलाय. चिखलदारामध्ये काँग्रेसच्या नदराध्यक्षपदाच्या उमेदवाराने विजय मिळवलाय. अमरावतीमधील 13 पैकी 6जागांवर भाजपला विजय मिळवलाय. अजित पवार आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मात्र खातेही उघडता आलेले नाही. भारतीय जनता पक्षाने आपले वर्चस्व कायम राखले असून, बहुतांश नगरपरिषदांवर कमळ फुलले आहे.
चिखलदरा आणि दर्यापूरमध्ये काँग्रेसने महायुतीला जोरदार धक्का दिला आहे. तर चांदुर बाजारमध्ये बच्चू कडू यांच्या 'प्रहार'ने आपली ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. भाजपने शेंदूरजना घाट, धामणगाव आणि अचलपूर अमरावती जिल्ह्यातील महत्त्वाच्या जागांवर भाजपने निर्विवाद यश संपादन केले आहे.
धामणगाव रेल्वे: येथे भाजपने 'क्लीन स्वीप' दिला आहे. नगराध्यक्षपदी अर्चना अडसड रोठे विजयी झाल्या असून, सर्वच्या सर्व २० जागा जिंकून काँग्रेसचा सुपडा साफ केला आहे.
advertisement
अचलपूर: जिल्ह्यात सर्वात मोठ्या असलेल्या अचलपूर नगरपरिषदेत भाजपच्या रुपाली माथने यांनी १४,०३० मतांच्या फरकाने एमआयएमच्या उमेदवाराचा पराभव केला.
शेंदूरजना घाट: नगराध्यक्षपदी सुवर्णा वरखेडे (भाजप) विजयी झाल्या आहेत. (भाजप-११, राष्ट्रवादी AP-६, शिवसेना शिंदे-२).
वरुड: भाजपचे ईश्वर सलामे नगराध्यक्षपदी निवडून आले असून १८ जागांसह स्पष्ट बहुमत मिळवले आहे.
अंजनगाव सुर्जी: भाजपचे अविनाश गायगोले नगराध्यक्षपदी विजयी झाले आहेत.
advertisement
चिखलदरा: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभा घेऊनही येथे काँग्रेसने भाजपला धक्का दिला. शेख अब्दुल शेख हैदर हे नगराध्यक्षपदी निवडून आले. काँग्रेसने २० पैकी १२ जागा जिंकल्या आहेत.
दर्यापूर: काँग्रेसने दणक्यात विजय मिळवला आहे. नगराध्यक्षपदी मंदाबाई भारसाकडे विजयी झाल्या असून, २५ पैकी १७ जागांवर काँग्रेसने विजय मिळवला आहे.
चांदुर बाजार: बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाने आपले वर्चस्व कायम राखले आहे. मनिषा नांगलिया नगराध्यक्षपदी विजयी झाल्या असून, पक्षाने १३ जागा जिंकल्या आहेत.
advertisement
मोर्शी: शिवसेना शिंदे गटाच्या प्रतीक्षा गुल्हाने नगराध्यक्षपदी निवडून आल्या आहेत.
चांदुर रेल्वे: वंचित बहुजन आघाडीच्या प्रियंका विश्वकर्मा यांनी नगराध्यक्ष पदावर विजय मिळवून सर्वांना चकित केले. मात्र, नगरसेवक संख्येत भाजप (११) मोठा पक्ष ठरला आहे.
नांदगाव खंडेश्वर: नगरपंचायतीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या प्राप्ती मारोटकर विजयी झाल्या आहेत. कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही
advertisement

अमरावती जिल्ह्यातील पक्षनिहाय निकाल

शेंदुरजना घाट नगरपरिषद निकाल
नगराध्यक्ष-सुवर्णा वरखेडे भाजप
निवडणूक आलेल्या नगरसेवक संख्या
  • भाजप - 11
  • शिवसेना शिंदे - 2
  • राष्ट्रवादी AP-6
  • अपक्ष-1
  • एकूण 20

अमरावती धामणगाव रेल्वे नगरपरिषद निकाल

नगराध्यक्ष-अर्चना अडसड रोठे-भाजप
निवडणूक आलेल्या नगरसेवक संख्या
  • भाजप -20
  • काँग्रेस - 00
  • एकूण 20
अमरावतीच्या मोर्शी नगर परिषदेचा निकाल
नगराध्यक्ष- प्रतीक्षा गुल्हाने शिवसेना शिंदे गट
advertisement
  • भाजप-6
  • राष्ट्रवादी SP-6
  • काँग्रेस-5
  • राष्ट्रवादी AP-2
  • शिवसेना शिंदे-2
  • प्रहार-1
  • अपक्ष-2
  • एकूण नगरसेवक-24
दर्यापूर नगरपरिषद निकाल
नगराध्यक्ष- मंदाबाई भारसाकडे-काँग्रेस
निवडणूक आलेल्या नगरसेवक संख्या
  • भाजप -4
  • काँग्रेस - 17
  • शिवसेना शिंदे - 2
  • राष्ट्रवादी-AP-1
  • राष्ट्रवादी-SP-1
  • एकूण-25
चांदुर रेल्वे नगरपरिषद निकाल
नगराध्यक्ष- प्रियंका विश्वकर्मा-वंचित बहुजन आघाडी
निवडणूक आलेल्या नगरसेवक संख्या
  • भाजप -11
  • वंचित-2
  • अपक्ष-2
  • काँग्रेस -4
  • भाकप-1
  • एकूण-20
नांदगाव खंडेश्वर नगरपंचायत निवडणुकीत शिवसेना उभाठा पक्षाच्या उमेदवार प्राप्ती विलास मारोटकर विजयी
advertisement
  • शिवसेना उबाठा 4
  • भाजप 3
  • राष्ट्रवादी शरद पवार गट 3
  • काँग्रेस 5
  • राष्ट्रवादी अजित पवार 1
  • प्रहार 1
  • एकूण-17
वरुड नगर परिषद...
वरुड नगर परिषद भाजपचे ईश्वर सलामे विजयी...
  • भाजप - १८
  • राष्ट्रवादी (अ.प.) - ४
  • काँग्रेस - २
  • प्रहार - १
  • अपक्ष - १
धारणी नगरपंचायत बलाबल
धारणी नगर परिषदेत सुनील चौथमल नगराध्यक्षपदी विजयी...
  • अपक्ष 3
  • भाजप 4
  • काँग्रेस 8
  • शिंदे गट 1
  • राष्ट्रवादी अजित पवार गट 1
चांदुर बाजार
नगराध्यक्ष - मनिषा नांगलिया, प्रहार....
  • प्रहार-13
  • अपक्ष-2
  • भाजप-2
  • काँग्रेस-1
  • राष्ट्रवादी-AP-1
  • राष्ट्रवादी-SP-1
चिखलदरा नगरपालिका अमरावती जिल्हा...
नगराध्यक्ष- शेख अब्दुल शेख हैदर ( काँग्रेस)
  • भाजप - ८
  • काँग्रेस - १२
  • एकूण जागा: २०
नगरपालिका नाव- अंजनगावसुर्जी
नगराध्यक्ष - भाजपा
अविनाश गायगोले
  • एकूण नगरसेवक - 28
  • भाजप - 06
  • शिवसेना शिंदे गट -03
  • शिवसेना उबाठा- 07
  • काँग्रेस - 10
  • समाजवादी-02

अमरावती जिल्हा अचलपूर नगरपरिषद..

भाजपच्या रुपाली रुपाली माथने 14030 मताने विजयी..
मिळालेली मते रुपाली माथने 32471
एमआयएम 18441
  • भाजप 9
  • काँग्रेस 17
  • प्रहार 2
  • राष्ट्रवादी घड्याळ 2
  • एमआयएम 4
  • अपक्ष 7
  • एकूण 41
जिल्हानगरपरिषद / नगरपंचायतविजयी उमेदवारांचे नावपक्ष
अमरावतीअचलपूररूपाली माथनेभाजप
अमरावतीअंजनगाव सुर्जीअविनाश गायगोलेभाजप
अमरावतीचांदूरबाजारमनीषा नांगलियाप्रहार
अमरावतीचांदूर रेल्वेप्रियंका विश्वकर्मावंचित
अमरावतीचिखलदराअब्दुल शेख हैदरकाँँग्रेस
अमरावतीदर्यापूरमंदा भारसाकडेकाँग्रेस
अमरावतीधामणगांव रेल्वेअर्चना अडसड रोठेभाजप
अमरावतीधरणीसुनील चौथमलभाजप
अमरावतीमोर्शीप्रतीक्षा गुल्हानेशिवसेना
अमरावतीनंद-खांदेश्वरप्राप्ती मारोडकरशिवसेना उबाठा
अमरावतीशेंदूरजनाघाटसुवर्णा वरकरेभाजप
अमरावतीवरुडईश्वर सलामेभाजप
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
फडणवीसांची सभा झाली तिथे काँग्रेसची सत्ता, प्रहार-वंचितची दमदार कामगिरी, अमरावतीत अनेकांना हादरे देणारा निकाल
Next Article
advertisement
Eknath Shinde Ambernath Nagar Parishad Result: अंबरनाथमध्ये शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का, प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कसा झाला पराभव? समोर आली १० कारणे....
शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का, प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कसा झाला पराभव? १० कारणं
  • शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का, प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कसा झाला पराभव? १० कारणं

  • शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का, प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कसा झाला पराभव? १० कारणं

  • शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का, प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कसा झाला पराभव? १० कारणं

View All
advertisement