VBA : नगरपरिषदेत वंचित आघाडीचा जलवा, प्रस्थापितांना दिला दणका; विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी

Last Updated:

वंचित बहुजन आघाडीने अमरावती, नांदेड, अकोला, कणकवली आणि अहिल्यानगरमध्ये आपली दखल घेण्यास भाग पाडलं.

News18
News18
मुंबई : नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकीच्या रिंगणामध्ये महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये अटीतटीचा सामना रंगला होता. तर कुठे महायुतीतच काँटे की टक्कर पाहण्यास मिळाली. पण, या सगळ्या लढाईमध्ये वंचित बहुजन विकास आघाडीनेही आपली चुणूक दाखवली आहे. लोकसभेत वंचित फॅक्टरने सत्ताधाऱ्यांना घाम फोडणाऱ्या वंचित बहुजन विकास आघाडीने नगरपरिषद निवडणुकीत चांगलंच कमबॅक केलं आहे. राज्याभरात नगराध्यक्षपद आणि नगरसेवक निवडून आले आहे. त्यामुळे वंचित आघाडीमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.
नगरपरिषद निवडणूक एकीकडे महायुतीने प्रतिष्ठेची करत धुरळा उडवून दिला. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये चांगलीच चढाओढ पाहण्यास मिळाली. पण, या लाटेतही वंचित बहुजन आघाडीने अमरावती, नांदेड, अकोला, कणकवली आणि अहिल्यानगरमध्ये आपली दखल घेण्यास भाग पाडलं. अमरावतीमध्ये वंचित बहुजन आघाडीने नगराध्यपद पटकावलं आहे. अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे नगरपरिषद निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या प्रियंका निलेश विश्वकर्मा यांची नगराध्यक्षपदी निवड झाली आहे. तर  अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी नगरपरिषद नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवार अख्तर खातुन यांचा विजय झाला आहे.
advertisement
दरम्यान,  नगरपंचायत आणि नगर परिषद निवडणुकांमध्ये फुले,शाहू,आंबेडकरवादी तसेच आरएसएसच्या राजकारणाच्या विरोधात असलेल्या मतदारांनी वंचित बहुजन आघाडीला मोठ्या प्रमाणात मतदान करून भक्कम पाठिंबा दिला असल्याचे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे.
निवडणुकांमध्ये मिळालेल्या यशामागे महिला आघाडी, युवा आघाडी, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे कार्यकर्ते तसंच आजी - माजी पदाधिकारी आणि विशेषतः युवा कार्यकर्त्यांचा मोठा वाटा असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. सर्वांनी पुढाकार घेऊन केलेली मेहनत बहुप्रतिक्षित यशाचे कारण ठरल्याचेही त्यांनी नमूद केले. हे यश सर्वांच्या सहकार्यामुळेच शक्य झाले असून, निवडून आलेल्या प्रत्येक नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचे त्यांनी अभिनंदन केलं आहे.
advertisement
वंचित बहुजन विकास आघाडीच्या विजयी उमेदवाराची यादी 
- नागपूरमध्ये वाडी नगरपरिषदेत सुनीता मेश्राम, शीतल नंदागवळी आणि राजेश जंगले विजयी
- कणकवली नगरपंचायत निवडणूक -   वंचित बहुजन आघाडीचे (सत्यशोधक सेक्युलर फ्रंट, महाराष्ट्र) उमेदवार लुकेश कांबळे विजयी
- वाडी नगरपरिषदेत राजेश जंगले यांचा विजय, याा ठिकाणी आणखी ४ उमेदवार विजयी
- घाटंजी नगरपरिषद पोटनिवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार पायल संघपाल कांबळे यांचा विजय
advertisement
- बुलढाणा: जळगाव जामोद नगरपरिषदेच्या  प्रभाग क्र. १ (ब) मधून डॉ. मोहम्मद सलीम मोहम्मद सबीर विजयी
- शेगाव नगरपरिषदेच्या निवडणुकीत सीमा वोवे यांचा विजय
- जामखेड नगरपरिषदेत संगीता भालेराव यांचा दणदणीत विजय
- अकोट : प्रभाग क्रमांक ९ च्या पोटनिवडणुकीत  इम्रान खान पठाण यांचा विजय
- बाळापूर नगरपरिषदेवर वंचित बहुजन आघाडीचे १० उमेदवार विजयी
advertisement
- नांदेड : कंधार नगर पालिकेत दिलीप संतराम देशमुख विजयी
- देवळाली प्रवरात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संतोष चोळके विजयी
- हिवरखेड नगरपरिषदेत सविता सुनील इंगळे यांचा विजय
- बार्शी टाकळी नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग 16 मधून शेख साबीर शेख अमीन विजयी
- चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती नगरपालिकेत जयश्री दुर्योधन यांचा नगरसेवकपदी विजय
advertisement
- अक्कलकोट नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग ११ मधून वंचितच्या उमेदवार प्रियांका मडीखांबे विजयी
- अहिल्यानगर - वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष संतोष चोळके विजयी
- वंचित बहुजन आघाडी संगमनेर सेवा समिती पुरस्कृत - प्रभाग क्रमांक 9 मधील अमजदखान उमरखान पठाण आणि विजया जयराम गुंजाळ विजयी
- मुर्तिजापूर नगरपरिषदेत  प्रभाग २ उमेदवार शशिकला सोळंके विजयी
advertisement
- यवतमाळ नगर परिषदेमध्ये उमेदवार आनंद गायकवाड विजयी
- कर्जत जामखेड नगरपरिषद मध्ये अॅड. अरुण जाधव विजयी
- भद्रावती नगरपालिकेत राखी संतोष रामटेके सलग तिसऱ्यांदा विजयी
- मूर्तिजापूर नगरपरिषदेत वंचित बहुजन आघाडीचे तसवर खान विजयी
- वंचित बहुजन आघाडीच्या तेल्हारा नगरपरिषद नगरसेवक पदाच्या कान्होपात्रा फाटकर विजयी
- अकोला बाळापूर नगरपरिषदेत संजय उमाळे विजयी
-  भूम नगरपरिषदेत रिमा ब्रह्मदेव शिंदे यांचा विजय
- धाराशिवमध्ये भगूर नगरपरिषदेत वंचित बहुजन आघाडीचे अजय वहाने विजयी
- हिवरखेड नगरपरिषदेत  सविता सुनील इंगळे यांचा विजय
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
VBA : नगरपरिषदेत वंचित आघाडीचा जलवा, प्रस्थापितांना दिला दणका; विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
Next Article
advertisement
Eknath Shinde Ambernath Nagar Parishad Result: अंबरनाथमध्ये शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का, प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कसा झाला पराभव? समोर आली १० कारणे....
शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का, प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कसा झाला पराभव? १० कारणं
  • शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का, प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कसा झाला पराभव? १० कारणं

  • शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का, प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कसा झाला पराभव? १० कारणं

  • शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का, प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कसा झाला पराभव? १० कारणं

View All
advertisement