Panchak March 2026: पापमोचनी एकादशीनंतर लगेच पंचक! मार्चमधील सर्वात अशुभ 5 दिवस, कशी घ्यावी काळजी
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
March Panchak 2026: मार्च 2026 मध्ये चैत्र नवरात्री सुरू होण्यापूर्वीच पंचक लागणार आहे. चैत्र नवरात्री 19 मार्च 2026 पासून सुरू होत आहे. यानुसार पंचक 16 मार्च, सोमवार रोजी संध्याकाळी 6 वाजून 14 मिनिटांनी सुरू होईल आणि 20 मार्च रोजी मध्यरात्री 2 वाजून 28 मिनिटांनी संपेल.
मुंबई : प्रत्येक महिन्यात काही दिवस अशुभ मानले जातात, यामध्ये हिंदू धर्मात पंचक काळ अशुभ दिवसांपैकी एक मानला जातो. या पाच दिवसांच्या काळात कोणतेही शुभ किंवा मांगलिक कार्य करणे वर्जित मानले जाते. धनिष्ठा नक्षत्रापासून रेवती नक्षत्रापर्यंतच्या पाच नक्षत्रांच्या काळाला पंचक म्हणतात. जेव्हा चंद्र कुंभ आणि मीन राशीतून प्रवास करतो, तेव्हाही पंचक लागते.
मार्च 2026 मध्ये चैत्र नवरात्री सुरू होण्यापूर्वीच पंचक लागणार आहे. चैत्र नवरात्री 19 मार्च 2026 पासून सुरू होत आहे. यानुसार पंचक 16 मार्च, सोमवार रोजी संध्याकाळी 6 वाजून 14 मिनिटांनी सुरू होईल आणि 20 मार्च रोजी मध्यरात्री 2 वाजून 28 मिनिटांनी संपेल.
आठवड्याच्या दिवसानुसार पंचकाचे प्रकार ठरतात. सोमवारपासून सुरू होणाऱ्या पंचकाला राज पंचक म्हणतात. राज पंचक हे तसे शुभ मानले जाते, पण तरीही यात लग्न किंवा गृहप्रवेशासारखी महत्त्वाची मांगलिक कार्ये करणे टाळले जाते. शनिवारपासून सुरू होणारे मृत्यू पंचक हा सर्वात जास्त अशुभ आणि कष्टकारी मानले जाते.
advertisement
शास्त्रांनुसार पंचकाच्या काळात घरात लाकडी काम करू नये आणि लाकूड फाटा गोळा करू नये. नवीन घराचे छत टाकू नये तसेच लाकडी पलंग किंवा खाट बनवू नये. दक्षिण दिशेला प्रवास करणे टाळावे, कारण ही यमराजाची दिशा मानली जाते. याशिवाय लग्न, साखरपुडा, मुंज, नामकरण किंवा नवीन सुनेचा गृहप्रवेश यांसारखी मंगल कार्ये करू नयेत.
advertisement
पंचक काळात काही गोष्टी करणे अनिवार्य असेल, तर हनुमानाची आराधना करावी आणि हनुमान चालीसा वाचावी. गरीब आणि गरजूंना अन्न, धन किंवा फळांचे दान करावे. दक्षिण दिशेला प्रवास करणे खूपच गरजेचे असेल, तर आधी हनुमान चालीसा वाचावी, पाच पावले उत्तर दिशेला चालावे आणि मग प्रवासाला सुरुवात करावी. या दिवसात तुळशीची पूजा करणे खूप फलदायी मानले जाते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 11, 2026 1:47 PM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Panchak March 2026: पापमोचनी एकादशीनंतर लगेच पंचक! मार्चमधील सर्वात अशुभ 5 दिवस, कशी घ्यावी काळजी










