20 आमदारांचा पक्ष अन् नगरपरिषदेत घसरले, ठाकरे गट नेमका जिंकला कुठे? संपूर्ण यादी

Last Updated:

महापालिकेच्या पेपरची तयारी करणारी ठाकरेंची शिवसेना नगरपालिकेच्या निवडणुकीत सपशेल नापास झाली आहे.

News18
News18
मुंबई :  नगरपालिका निवडणुकीत मविआची धुळधाण उडाली. ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसनं या निवडणुकीत एक प्रकारे बाय दिला होता.  नगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठ्या अपयशाला सामोरं जावं लागलं. भावकी आणि गावकीतली निवडणूक असल्याचं कारण देत ठाकरेंच्या शिवसेनेनं ही निवडणूक फारशी गांभीर्यानंच घेतली नव्हती.  ठाकरेंचे नेते प्रचारातून देखील गायब होते. परिणामी महापालिकेच्या तयारीसाठी नगरपालिकेकडे दुर्लक्ष झाल्याचे पाहायला मिळाले आहे.
निवडणुकीच्या प्रचारात ठाकरेंच्या शिवसेनेचे वरिष्ठ नेते दिसले नाही. उद्धव ठाकरेंनी सभा घेतली नाही. आदित्य ठाकरेही प्रचारात दिसले नाही. ठाकरे बंधूंनी महापालिका निवडणुकीवर लक्ष केंद्रित केलं होतं. त्यामुळे नगरपालिका निवडणुकीत दारुण प्रभाव झाला असून विधानसभेत आमदारसंख्या 20 असलेल्या ठाकरे गटाला केवळ 9 जागांवर समाधान मानावे लागले आहे.

नेत्यांच्या अनुपस्थितीमुळे प्रतिमेवर झालेला परिणाम

advertisement
उद्धव ठाकरे हे सेनापती मैदानात नसल्यामुळे त्यांचं सैन्य स्थानिक नेत्यांच्या नेतृत्वात लढलं. मात्र हे पुरेसं नव्हतं. एकंदरीतच ठाकरेंच्या शिवसेनेचं कचखाऊ धोरण, नेत्यांच्या अनुपस्थितीमुळे प्रतिमेवर झालेला परिणाम आणि मतदारांना आश्वासक न वाटलेला पक्ष याचा परिणाम धुळधाण उडण्यात झाला.   नेते पराभूत मानसिकतेतून बाहेर पडत नाहीत, हेच त्यांच्या पराभवाचं कारण असल्याचा टोला सत्ताधाऱ्यांनी लगावला.  उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे प्रचारात उतरले नाहीत, यामुळे मतदारांना ठाकरे गटाविषयी विश्वासच वाटला नाही, याकडे राजकीय विश्लेषकांनी लक्ष वेधलं.
advertisement

ठाकरे गटाच्या विजयी उमेदवारांची यादी (Uddhav Thackeray Shivsena Winner List) 

जिल्हानगरपरिषद / नगरपंचायतीचे नावविजयी उमेदवारांचे नावपक्ष
रायगडश्रीवर्धनअतुल चोगलेउबाठा
जळगावधरणगांवलीलाबाई चौधरीउबाठा
जळगावयावलछाया पाटीलउबाठा
सोलापूरकुरडूवाडीजयश्री भिसेउबाठा
छ. संभाजीनगरफुलंब्रीराजेंद्र ठोंबरेउबाठा
नांदेडकिनवटसुजाता एड्रलवारउबाठा
अमरावतीनंद-खांदेश्वरप्राप्ती मारोडकरउबाठा
बुलढाणामेहकरकिशोर गारोडेउबाठा
यवतमाळढाणकीअर्चना वासमवारउबाठा
advertisement
उद्धव ठाकरेंनी काही सभा घेतल्या असत्या, आदित्य ठाकरेंसारख्या युवा नेत्यांनी रोड शो केले असते तरी मतदारांवर काही प्रमाणात प्रभाव पडला असता. मात्र महापालिकेच्या पेपरची तयारी करणारी ठाकरेंची शिवसेना नगरपालिकेच्या निवडणुकीत सपशेल नापास झाली आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
20 आमदारांचा पक्ष अन् नगरपरिषदेत घसरले, ठाकरे गट नेमका जिंकला कुठे? संपूर्ण यादी
Next Article
advertisement
Eknath Shinde Ambernath Nagar Parishad Result: अंबरनाथमध्ये शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का, प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कसा झाला पराभव? समोर आली १० कारणे....
शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का, प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कसा झाला पराभव? १० कारणं
  • शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का, प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कसा झाला पराभव? १० कारणं

  • शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का, प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कसा झाला पराभव? १० कारणं

  • शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का, प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कसा झाला पराभव? १० कारणं

View All
advertisement