गोकुळची रणधुमाळी! वार्षिक सभेत महाडिक विरुद्ध मुश्रीफ गट आमनेसामने, पुढच्या निवडणुकीची नांदी आजच ठरणार
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
Kolhapur News : कोल्हापूरच्या राजकारणाची दिशा ठरवणारी 'गोकुळ' दूध संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवारी होत आहे. पुढील वर्षी होणाऱ्या संचालक मंडळाच्या निवडणुकीपूर्वीचा...
Kolhapur News : दूध उत्पादक संघातील 'राजकीय महाभारत' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'गोकुळ' दूध संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवारी होत आहे. पुढील वर्षी होणाऱ्या संचालक मंडळाच्या निवडणुकीपूर्वीची ही शेवटची सभा असल्याने दोन्ही बाजूंकडून ती गाजविण्याची जोरदार तयारी सुरू आहे. गोकुळवरील वर्चस्वासाठी हा शेवटचा संघर्ष असून, यानंतरचा खरा सामना थेट निवडणुकीच्या मैदानातच होणार आहे. त्यामुळे, कोल्हापूरच्या राजकारणाची पुढची दिशा ठरवणाऱ्या या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सत्तेचा खेळ आणि विरोधाची धार
राज्यातील सत्तांतरानंतर 'गोकुळ'मध्येही राजकीय समीकरणे बदलली. गोकुळचे अध्यक्ष निवडण्याचे स्थानिक नेत्यांचे अधिकार राज्य पातळीवरील नेत्यांकडे गेले. तडजोडीतून नाविद मुश्रीफ यांची अध्यक्षपदी निवड झाली असली तरी, महाडिक गटाचा कारभारावरील आक्षेप कायम आहे. शौमिका महाडिक यांनी "अध्यक्ष महायुतीचे असले तरी सत्ता कुणाची?" असा प्रश्न विचारून आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
advertisement
जाजम आणि घड्याळाचा मुद्दा गाजणार
सभेतील सर्वात मोठा मुद्दा म्हणजे दूध संस्थांना देण्यात आलेल्या जाजम आणि घड्याळाची खरेदी. ठाकरे शिवसेनेने यावर आक्षेप घेतला असून, त्याची चौकशी करण्यासाठी दूध विकास विभागाने चौकशी अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे. गोकुळ व्यवस्थापनाने मात्र ही खरेदी नियमांनुसारच झाल्याचे म्हटले आहे. या चौकशी अहवालाची प्रतीक्षा असून, मंगळवारच्या सभेत हा मुद्दा चांगलाच गाजण्याची शक्यता आहे. महाडिक गटाने या खरेदीवर आक्षेप घेत एकूण 21 प्रश्न विचारले आहेत, ज्यामुळे सत्ताधाऱ्यांवर दबाव वाढला आहे. ही सभा केवळ हिशोबाची नाही, तर पुढील निवडणुकीची नांदी ठरणार आहे.
advertisement
हे ही वाचा : अमूलला थेट आव्हान गोकूळचं ठरलं, डेअरीचं मैदान मारणार, आणखी 2 नवीन प्रोडक्टची बाजारात एन्ट्री
हे ही वाचा : थकबाकीदारांनो, 'ही' संधी सोडू नका! पाणीपट्टीत मिळणार 'इतकी' सूट, कोल्हापूर महापालिकेची मोठी घोषणा
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 09, 2025 2:15 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
गोकुळची रणधुमाळी! वार्षिक सभेत महाडिक विरुद्ध मुश्रीफ गट आमनेसामने, पुढच्या निवडणुकीची नांदी आजच ठरणार