गिरीश महाजनांकडून 'लाव रे तो व्हिडीओ', सेनेच्या नेत्याचा VIDEO दाखवला सभेत, नंतर मुलाच्या पालकाने घेरलं

Last Updated:

हे दोन तरुण शिंदेंच्या शिवसेनेचे महानगर प्रमुख बंटी तिदमे यांचे कार्यकर्ते असल्याचा दावा करणारा व्हिडिओ भर सभेत दाखवल्याने खळबळ उडवली.

News18
News18
लक्ष्मण घाटोळ, प्रतिनिधी
नाशिक : महापालिका निवडणुकीचा प्रचार आता लवकरच संपणार आहे. त्यामुळे सगळीकडे प्रचाराचा धुरळा उडाला आहे. नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीला अवघे दोन दिवस शिल्लक असताना मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिक मधल्या एका जाहीर सभेत लाव रे तो व्हिडीओचा प्रयोग केला. यावेळी महाजनांनी थेट शिंदेंच्या शिवसेनेच्या महानगर प्रमुखावरच आरोप केला. या आरोपानंतर महाजनांना शिवसैनिकांनी घेरलं होतं. महाजनांच्या या आरोपानंतर मात्र नाशिक मधलं वातावरण चांगलंच तापलं आहे.
advertisement
त्याचं झालं असं की, नाशिकमध्ये गिरीश महाजनांची सभा पार पडली.  या सभेत शिंदेंच्या शिवसेनेचं महानगर प्रमुख प्रवीण तिदमे यांचे ड्रग्स पेडलर तरुणांबरोबरचे व्हिडिओ दाखवत नाशिकच्या ड्रग्स प्रकरणाशी शिंदे सेनेच्या नेत्यांचे संबंध असल्याचा खळबळजनक दावा केला.
गिरीश महाजन यांनी त्यांच्या नाशिकच्या जाहीर सभेत दाखवत शिंदे सेनेचे महानगरप्रमुख प्रवीण उर्फ बंटी तिदमे यांच्यावर गंभीर आरोप केले. नाशिक शहरातल्या कट्ट्यांवर ड्रग्स पिणारे शीतीज मोराडे आणि चेतन पाटील हे दोन तरुण शिंदेंच्या शिवसेनेचे महानगर प्रमुख बंटी तिदमे यांचे कार्यकर्ते असल्याचा दावा करणारा व्हिडिओ भर सभेत दाखवल्याने खळबळ उडवली.
advertisement
इतकंच नाही तर प्रवीण उर्फ बंटी तिदमे हा ब्लॅकमेलर असून नाशिक मधल्या बिल्डरांना आणि अधिकाऱ्यांना तो ब्लॅकमेल करतो, असाही गंभीर आरोप गिरीश महाजन यांनी केला होता.
दरम्यान, गिरीश महाजन यांनी जाहीर सभेत ज्या मुलांचे व्हिडीओ दाखवले. त्या व्हिडीओतील चेतन पाटील या मुलांच्या पालकांनी मंत्री गिरीश महाजन यांना सभेच्या बाहेर येतात घेरलं.  "आमच्या मुलांची बदनामी का केली" असा जाब विचारल्याने चांगलाच गोंधळ उडला.
advertisement
शहरातील ड्रग्स आणि MD पेडलर यांचे शिंदे यांच्या शिवसेनेचे महानगरप्रमुख प्रवीण उर्फ बंटी तिदमे यांच्याशी संबंध असल्याचा व्हिडिओ आणि फोटो समोर आणत मंत्री गिरीश महाजन यांनी या सगळ्या प्रकरणावरून शिंदे सेनेला घेरलं आहे. त्यामुळे ऐन मतदानाच्या काही तास अगोदर सुरू झालेल्या या आरोपांच्या फैरी कुठवर जाता आणि काय काय समोर येतं, हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
गिरीश महाजनांकडून 'लाव रे तो व्हिडीओ', सेनेच्या नेत्याचा VIDEO दाखवला सभेत, नंतर मुलाच्या पालकाने घेरलं
Next Article
advertisement
ZP Election: मोठी बातमी!  जिल्हा परिषद निवडणुकीबाबत सुप्रीम कोर्टात मोठी घडामोड, नवा आदेश काय?
मोठी बातमी! जिल्हा परिषद निवडणुकीबाबत सुप्रीम कोर्टात मोठी घडामोड, नवा आदेश काय
  • स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका ३१ जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश र

  • सुप्रीम कोर्टाची मुदत ओलांडली जाण्याचे संकेत होते

  • लांबणीवर पडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश

View All
advertisement