अमूलला थेट आव्हान गोकूळचं ठरलं, डेअरीचं मैदान मारणार, आणखी 2 नवीन प्रोडक्टची बाजारात एन्ट्री
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
गोकूळ दूध महासंघ चीज आणि आईस्क्रीम बाजारात उतरणार आहे. मदर डेअरी, अमूलला टक्कर देण्यासाठी हा निर्णय घेतला असून, ग्राहकांसाठी लवकरच नवीन उत्पादने येणार.
ज्ञानेश्वर साळोखे, प्रतिनिधी कोल्हापूर: मदर डेअरी, अमूल या नावाजलेल्या ब्राण्डना टक्कर देण्यासाठी आता कोल्हापूरमधील प्रसिद्ध गोकूळ दूध महासंघाने बैठकीत मोठा निर्णय घेतला आहे. दूध उत्पादनात महाराष्ट्रात अग्रगण्य असलेले गोकूळ आता चीज आणि आईस्क्रीमच्या बाजारपेठेत उतरणार आहे. मदर डेअरी, आणि अमूल यांसारख्या मोठ्या कंपन्यांना टक्कर देण्यासाठी गोकूळने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून, लवकरच ही नवीन उत्पादने ग्राहकांसाठी उपलब्ध होणार आहेत. गोकूळचं गाईचं दूध आणि गोकूळचं म्हशीचं दूध दह्यासाठी आणि दुग्धजन्य पदार्थ महाराष्ट्रात लोकप्रिय आहेत. दुधाच्या यशस्वी बाजारपेठेमुळे आता त्यांनी चीज आणि आईस्क्रीमच्या क्षेत्रातही प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.
या नवीन उत्पादनांमुळे गोकूळची बाजारपेठ आणखी विस्तारण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे. या निर्णयामुळे गोकूळ आणि इतर मोठ्या दूध उत्पादक कंपन्यांमध्ये स्पर्धा वाढणार असून, ग्राहकांना विविध प्रकारचे आणि उच्च दर्जाचे चीज आणि आईस्क्रीम या नवीन उत्पादनांची गुणवत्ता आणि किंमत कशी असेल, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
Location :
Kolhapur,Kolhapur,Maharashtra
First Published :
September 09, 2025 1:50 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
अमूलला थेट आव्हान गोकूळचं ठरलं, डेअरीचं मैदान मारणार, आणखी 2 नवीन प्रोडक्टची बाजारात एन्ट्री