Bitter Gourd : कडू कारल्याचे आरोग्यदायी गुण, शरीराच्या विविध समस्यांवर आहे गुणकारी

Last Updated:

आयुर्वेदातही कारल्याचे औषधी गुण सांगितलेत. आयुर्वेदात कारल्याला करवेलक म्हणतात, ज्यामधे अशुद्ध रक्त, रक्तातली वाढलेली साखर आणि जंतांवरही हे औषध आहे. कारल्यामुळे रक्त शुद्ध होतं आणि शरीराला अ, ब आणि क जीवनसत्त्वं मिळतात. पाहूयात कारलं शरीरासाठी का गुणकारी ठरतं.

News18
News18
मुंबई : कारलं म्हटलं की आधी कडूपणा आठवतो. पण हाच कडूपणा आणि कारल्याचे औषधी गुणधर्म आपल्या प्रकृतीसाठी महत्त्वाचे आहेत.
आयुर्वेदातही कारल्याचे औषधी गुण सांगितलेत. आयुर्वेदात कारल्याला करवेलक म्हणतात, ज्यामधे अशुद्ध रक्त, रक्तातली वाढलेली साखर आणि जंतांवरही हे औषध आहे. कारल्यामुळे रक्त शुद्ध होतं आणि शरीराला अ, ब आणि क जीवनसत्त्वं मिळतात. पाहूयात कारलं शरीरासाठी का गुणकारी ठरतं.
advertisement
स्वादुपिंडापर्यंत पोहोचून शुद्ध करणारी वनस्पती म्हणजे कारलं. यामुळे रक्ताचं खोलवर पोषण होतं आणि आतड्यांतील जंत दूर करणं, जखमा बऱ्या करणं आणि त्वचेच्या समस्या बऱ्या करण्यासाठी कारलं उपयुक्त आहे. शरीराला अनेक आजारांपासून मुक्त करण्याची शक्ती देखील कारल्यात आहे.
स्तनपान देणाऱ्या महिलांसाठी देखील उत्तम - स्तनपान देणाऱ्या महिलांसाठी कारलं औषध म्हणून देखील काम करतं, कारण कारल्यामुळे मातांमधे दूध देणारं संप्रेरक तयार करण्यास उत्तेजन मिळतं. पण डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच कारलं खा. कोणत्याही प्रकारची जखम असेल तर कारल्याची पेस्ट औषधासारखी काम करते. जखम बरी करण्यासाठी कारलं उपयुक्त आहे, कारल्यामुळे संसर्ग रोखला जातो आणि सूज कमी होते.
advertisement
कारलं आतड्यांसाठी देखील खूप महत्वाचं आहे.
आतडी - आतड्यांचं डिटॉक्सिफिकेशन करणं अत्यंत महत्वाचं आहे. आतडी अनेक दिवस अस्वच्छ राहिली तर आतड्यांमधे जंत आणि हानिकारक जीवाणू वाढू शकतात. त्यामुळे, भूक कमी लागते, जेवणानंतर लगेच शौचालयात जाण्याची इच्छा होते आणि शरीर अन्न पचवू शकत नाही. अशावेळी, कारल्याचा रस पिणं हा चांगला पर्याय आहे. कारल्याचा कडूपणा कमी करण्यासाठी, त्यावर मीठ लावा आणि काही वेळ तसंच राहू द्या. यामुळे पाणी बाहेर पडेल आणि कारल्याचा कडूपणा कमी होईल.
advertisement
त्वचेसाठी सर्वोत्तम - चेहऱ्यावर भरपूर मुरुम येणं हे रक्तातील अशुद्धतेचं प्रमाण वाढल्याचं लक्षण आहे. दररोज कारल्याचा रस पिणं रक्त शुद्ध करण्यासाठी फायदेशीर आहे. यामुळे रक्त शुद्ध होतं आणि त्वचेचा पोत सुधारतो. त्वचेला खाज सुटणं आणि त्वचा कोरडी होणं यापासून देखील कारल्यामुळे आराम मिळतो.
Click here to add News18 as your preferred news source on Google.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Bitter Gourd : कडू कारल्याचे आरोग्यदायी गुण, शरीराच्या विविध समस्यांवर आहे गुणकारी
Next Article
advertisement
BMC Election Result 2026 : मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की ठाकरे बंधू? पाहा कोण आघाडीवर
मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की ठाकरे बंधू? पाहा कोण आघाडीवर
  • मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की महाविकास आघाडी? पाह

  • मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) सत्तेचा फैसला आज

  • सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात झाली

View All
advertisement