Face care : चेहऱ्याच्या समस्यांवर नैसर्गिक उत्तर, मधाचा असा करा वापर, चेहरा दिसेल चमकदार
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
प्रदूषण, जीवनशैलीतले बदल, ताणतणावामुळे त्वचेची नैसर्गिक चमक जाते आणि चेहरा निस्तेज दिसतो. अशावेळी मध हा एक चांगला पर्याय आहे. मधामधले अँटीबॅक्टेरियल, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म त्वचेसाठी पोषक आहेत. केवळ मध, किंवा मध आणि लिंबू किंवा मध आणि दूध असे तीन पर्याय त्वचेच्या रक्षणासाठी उत्तम आहेत.
मुंबई : चेहरा स्वच्छ, सुंदर दिसावा यासाठी कोणतंही बाहेरचं प्रॉडक्ट वापरायची गरज लागू नये असं वाटत असेल तर इथे दिलेले पर्याय नक्की वाचा.
प्रत्येकाला नैसर्गिकरित्या चेहरा चांगला दिसावा असं वाटतं. पण काहीवेळा प्रदूषण, जीवनशैलीतले बदल, ताणतणावामुळे त्वचेची नैसर्गिक चमक जाते आणि चेहरा निस्तेज दिसतो. अशावेळी मध हा एक चांगला पर्याय आहे. मधामधले अँटीबॅक्टेरियल, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म त्वचेसाठी पोषक आहेत. केवळ मध, किंवा मध आणि लिंबू किंवा मध आणि दूध असे तीन पर्याय त्वचेच्या रक्षणासाठी उत्तम आहेत.
advertisement
मध - त्वचा खूप कोरडी असेल तर थेट चेहऱ्यावर मध लावू शकता. यामुळे त्वचा मॉइश्चरायझ होईल आणि कोरडेपणा कमी होईल. चेहरा क्लींजरनं स्वच्छ करा. चेहऱ्यावर मधाचा थर हलक्या हातानं लावा आणि वीस मिनिटं तसंच राहू द्या. नंतर, कोमट पाण्यानं चेहरा धुवा. यामुळे त्वचा हायड्रेट राहील आणि हळूहळू चेहरा उजळेल.
advertisement
मध आणि लिंबू - चेहऱ्यावरचे मुरुमांचे चट्टे कमी करण्यासाठी, मध आणि लिंबू वापरू शकता. अर्धा चमचा लिंबू एक चमचा मधात घाला आणि चांगलं मिसळा. यानंतर, मिश्रण चेहऱ्यावर लावा आणि पंधरा मिनिटं तसंच राहू द्या. नंतर, थंड पाण्यानं धुवा. काही दिवस नियमितपणे असं केल्यानं पिग्मेंटेशन आणि टॅनिंग कमी होईल आणि चेहरा नैसर्गिकरित्या चमकू लागेल. लिंबात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असतं. त्वचा संवेदनशील असेल तर लिंबू काळजीपूर्वक वापरा.
advertisement
मध आणि दूध - कोरड्या आणि निस्तेज त्वचेला चमक देण्यासाठी मध आणि दूध वापरू शकता. एक चमचा मध आणि एक चमचा कच्चं दूध मिसळून एक गुळगुळीत पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्यावर आणि मानेवर हळूवारपणे लावा आणि पंधरा - वीस मिनिटं तसंच राहू द्या. त्यानंतर, मसाज करा आणि स्वच्छ धुवा. यामुळे मृत पेशी निघून जातील आणि त्वचेला नैसर्गिक चमक मिळेल.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 16, 2026 2:38 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Face care : चेहऱ्याच्या समस्यांवर नैसर्गिक उत्तर, मधाचा असा करा वापर, चेहरा दिसेल चमकदार









