Skin Care : महागडी प्रॉडक्ट्स नाही, योग्य सवयी जोपासा, पाहूया सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्टचा सल्ला
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर यांच्या मते, चांगली त्वचा तुम्ही काय खरेदी करता यावर नाही तर तुम्ही कसे जगता यावर अवलंबून असते. त्वचा निरोगी आणि चमकदार ठेवण्यासाठी, पाणी प्या, वेळेवर झोपा, सक्रिय रहा आणि अनावश्यक ट्रेंड टाळा. चमकदार त्वचा मिळविण्यासाठी, तुम्हाला महागड्या उत्पादनांची आवश्यकता नाही, फक्त योग्य सवयींची आवश्यकता आहे हा त्यांनी दिलेला मोलाचा सल्ला आहे.
मुंबई : त्वचा सुंदर दिसावी म्हणून केवळ स्किनकेअर रुटिन उत्तम असणं उपयोगाचं नाही. तर त्यासाठी तुम्ही काय करता हे महत्त्वाचं आहे.
सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर सोशल मीडियावर फिटनेसविषयी अनेक महत्त्वाच्या आणि सहज करता येईल अशा डाएटच्या आणि व्यायामासंदर्भातल्या पोस्ट करत असतात. त्या करीना कपूरच्याही डाएट एक्सपर्ट आहेत. उत्तम त्वचा मिळवण्यासाठी ड्रेसिंग टेबलवर दहा बाटल्या नाही तर काही सोप्या सवयी पुरेशा आहेत असं त्यांनी एका पोस्टमधे म्हटलंय.
ऋजुता दिवेकर यांनी या व्हिडिओत स्वतःचं स्किनकेअर रुटिन शेअर केलंय. यात त्यांनी चार मूलभूत पायऱ्या सांगितल्यात. यासाठी कोणत्याही उत्पादनाची आवश्यकता नाही. पाहूयात ऋजुता यांनी सांगितलेल्या मोलाच्या गोष्टी.
advertisement
पाणी प्या - ऋजुता यांच्या मते, सर्वात सोपा ग्लो-अप उपाय म्हणजे हायड्रेटेड राहणं. त्यांच्या मते, त्वचा मऊ, स्वच्छ आणि तजेलदार ठेवण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे पाणी. दिवसभर जास्त पाणी पिण्यासाठी हाताशी पाणी ठेवा. यामुळे त्वचेवर थकवा आणि कंटाळवाणेपणा येणार नाही.
advertisement
लवकर झोपा - महागड्या फेसमास्क विसरा, वेळेवर झोपणं हेच तुमच्या त्वचेसाठी अधिक फायदेशीर आहे. चांगली झोप म्हणजे शरीराची दुरुस्ती. यामुळे कोलेजन निर्मिॉतीला चालना मिळते आणि काळी वर्तुळं आणि सूज कमी होते. त्या स्वत: रात्री 9.30-10 वाजेपर्यंत झोपण्याचा प्रयत्न करतात.
सक्रिय राहा - ऋजुता यांच्या मते, शारीरिक हालचाली सौंदर्याचा एक महत्त्वाचा भाग आहेत. व्यायामामुळे रक्तप्रवाह वाढतो, ज्यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक ताजेपणा येतो. कितीही व्यस्त असल्या तरी, ती सकाळी नऊ वाजण्यापूर्वी व्यायाम पूर्ण करण्यावर त्यांचा कटाक्ष असतो.
advertisement
व्हायरल स्किनकेअर ट्रेंडपासून दूर राहा - हे ट्रेंड अनेकदा तात्कालिक परिणाम देतात. यापेक्षा दीर्घकालीन सवयी वास्तविक बदल घडवून आणतात, त्यामुळे जलद उपाय उपयोगाचे नाहीत.
सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट रुजुता दिवेकर यांच्या मते, चांगली त्वचा तुम्ही काय खरेदी करता यावर नाही तर तुम्ही कसे जगता यावर अवलंबून असते. त्वचा निरोगी आणि चमकदार ठेवण्यासाठी, पाणी प्या, वेळेवर झोपा, सक्रिय रहा आणि अनावश्यक ट्रेंड टाळा. चमकदार त्वचा मिळविण्यासाठी, तुम्हाला महागड्या उत्पादनांची आवश्यकता नाही, फक्त योग्य सवयींची आवश्यकता आहे हा त्यांनी दिलेला मोलाचा सल्ला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 15, 2026 9:10 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Skin Care : महागडी प्रॉडक्ट्स नाही, योग्य सवयी जोपासा, पाहूया सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्टचा सल्ला










