'आम्ही जन्माला येतो, मग आमचं शोषण होतं', प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत बालपणी घडलेलं भयंकर, सांगितला तो घाणेरडा प्रसंग
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्रीने लहानपणी झालेल्या लैंगिक शोषणाबद्दल आणि पुरुषांच्या विकृत मानसिकतेबद्दल मनमोकळा संवाद साधला आहे.
advertisement
advertisement
advertisement
'The Male Feminist' या पॉडकास्टमध्ये बोलताना पार्वतीने आपल्या लहानपणीच्या त्या सुन्न करणाऱ्या आठवणींना उजाळा दिला. ती म्हणाली, "आम्ही जन्माला येतो आणि लगेचच आमचं शोषण सुरू होतं. मला आजही आठवतंय, मी खूप लहान होते. कधी ऑटोमध्ये चढताना कोणीतरी चिमटा काढायचा, तर कधी रेल्वे स्टेशनवर आई-बाबांसोबत चालत असताना अचानक कोणीतरी छातीवर मारून जायचं. तो स्पर्श नव्हता, तर तो एखाद्या थप्पडसारखा प्रहार होता. एका लहान मुलीसाठी तो शारीरिक आणि मानसिक धक्का खूप मोठा होता."
advertisement
या धक्कादायक अनुभवांमुळे पार्वतीच्या आईला तिला जगाशी लढण्यासाठी वेगळ्या पद्धतीने तयार करावं लागलं. पार्वती सांगते, "माझी आई मला रस्त्यावरून कसं चालावं, याचे धडे द्यायची. ती सांगायची की, विंडो शॉपिंग करत थांबू नकोस, चालताना पुरुषांच्या हातांकडे लक्ष ठेव की त्यांचे हात कुठे शिवशिवतायत. एका आईला आपल्या चिमुकल्या मुलीला हे सगळं शिकवावं लागणं, हे आपल्या समाजाचं किती मोठं अपयश आहे?"
advertisement
advertisement
पार्वती केवळ एक उत्तम अभिनेत्री नाही, तर ती जेंडर इक्वॅलिटी, महिलांची सुरक्षा आणि कन्सेन्ट यांसारख्या मुद्द्यांवर नेहमीच आवाज उठवत आली आहे. 'चार्ली', 'बेंगलोर डेज' आणि 'मरयान' सारख्या सुपरहिट चित्रपटांनंतरही तिने आपली साधी राहणी आणि स्पष्टवक्तेपणा जपला आहे. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील 'वुमेन इन सिनेमा कलेक्टिव्ह' (WCC) च्या स्थापनेतही तिचा मोठा वाटा आहे.










