WPL च्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून आली, मुंबईच्या जेमिमाने बजावला मतदानाचा हक्क

Last Updated:

टीम इंडियाच्या स्टार खेळाडू आणि दिल्ली कॅपिटल्सची कर्णधार जेमिमा रॉड्रीग्जने डब्ल्युपीएलच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून मुंबई महानगरपालिका निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला आहे.

bmc election 2026 jemimah rodrigues
bmc election 2026 jemimah rodrigues
WPL 2026 : मुंबईसह राज्यातील 29 महापालिका निवडणुकीसाठी आज मतदान पार पडलं आहे. या निवडणुकीत बॉलिवूड अभिनेत्यांसह खेळाडूंनी मतदानाचा हक्क बजावला होता.त्यात टीम इंडियाच्या स्टार खेळाडू आणि दिल्ली कॅपिटल्सची कर्णधार जेमिमा रॉड्रीग्जने डब्ल्युपीएलच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून मुंबई महानगरपालिका निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला आहे.
खरं तर सध्या वुमेन्स प्रिमियर लीग सूरू आहे.त्यामुळे टीम इंडियाचे सर्वच खेळाडू या लीगमध्ये व्यस्त आहेत. त्यात बुधवारी जेमीमा रॉड्रीग्जच्या दिल्ली कॅपिटल्सने डब्ल्यूपीएलचा पहिला सामना जिंकला होता. या विजयानंतर जेमिमाई रॉड्रीग्जने गुरुवारी मुंबई महापालिका निवडणुकासाठी मतदान केले आहे. या मतदानाचा फोटो देखील समोर आला आहे.
दिल्ली कॅपिटल्सचा पहिला विजय
डब्ल्युपीएलच्या कालच्या सामन्यात जेमीमा रॉड्रीग्जच्या दिल्ली कॅपिटल्सने युपी वॉरियर्सचा 7 विकेट राखून पराभव केला होता. हा विजय मिळवून जेमीमाने डब्ल्युपीएलमध्ये खातं उघडलं होतं. युपी वॉरियर्सने दिलेल्या 154 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सची सुरूवात चांगली झाली होती. दिल्लीकडून लिझेले लीने 67 धावांची सर्वाधिक खेळी केली आणि शेफाली वर्माने 36 धावा केल्या. त्यानंतर शेवटी लॉरा वोल्व्हार्ट आणि मेरीजेन कॅपने दिल्ली कॅपिटल्ससा हा सहज विजय मिळवून दिला. आणि दिल्लीने 7 विकेटने सामना जिंकला.
advertisement
खरं तर या सामन्यात टीम इंडियाचा माजी कर्णधार रोहित शर्मा याचा मित्र आणि युपी वॉरियर्सचा कोच अभिषेक नायर याच्या एका निर्णयामुळे युपीचा पराभव झाला. त्याचं झालं असं की युपीची सुरूवात खराब झाली होती. किरण नवगिरे शुन्यावर बाद झाली होती. तिच्यानंतर फोईब लीचिफिल्ड 27 वर बाद झाली. या दोघींनंतर मॅग लॅनिंगने सर्वाधिक 54 धावांची खेळी करून बाद झाला.त्यामंतर मैदानात हरलीन देओल आणि श्वेता सेहरावत होती. त्यावेळी श्वेताने तिच्या डावाची सूरूवात केली होती. तर हरलीन देओल 47 वर खेळत होती,त्यामुळे अभिषेक नायरने देओलला रिटायर्ड आऊट केले. हाच निर्णय युपीला भारी पडला.
advertisement
कारण हरलीन देओल रिटायर्ड आऊट झाल्यानंतर तिच्या मागचे सर्व खेळाडू एकेरी धाव काढून बाद झाले त्यामुळे युपी 154 धावाच ठोकू शकली. जर हरलीने देओल मैदानात असती तर कदाचित धावा आणखीण करता आल्या असत्या.त्यामुळे अभिषेक नायरच्या त्या निर्णयामुळे युपीचा पराभव झाला.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
WPL च्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून आली, मुंबईच्या जेमिमाने बजावला मतदानाचा हक्क
Next Article
advertisement
Dhule Election: भाजप कार्यकर्त्यांचा धिंगाणा, शिवीगाळ केली, ईव्हीएम मशीन फोडली, शिंदे गटाच्या आरोपाने खळबळ
भाजप कार्यकर्त्यांचा धिंगाणा, शिवीगाळ केली, ईव्हीएम मशीन फोडली, शिंदे गटाच्या आर
  • मतदान केंद्रावर मोठा गोंधळ झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

  • प्राथमिक विद्यामंदिरातील मतदान केंद्रात असलेल्या मतदान यंत्राची तोडफोड

  • भाजप कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्याचा आरोप शिंदे गटाने केला आहे.

View All
advertisement