Weather Alert : महाराष्ट्रात वारं फिरलं, पुढील 24 तास महत्त्वाचे!, हवामान खात्याकडून अलर्ट

Last Updated:
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील दोन दिवस राज्यात ढगाळ हवामान कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे थंडीत चढ-उतार होत राहणार असून काही भागांत पुन्हा थंडी वाढण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.
1/7
राज्यात सध्या ढगाळ वातावरणाचा प्रभाव वाढल्याने थंडीचा कडाका काहीसा ओसरल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अनेक भागांत दुपारच्या वेळी उकाडा जाणवत असून किमान तापमानात वाढ झाली आहे. राज्यातील बहुतांश भागांत तापमान 10 अंश सेल्सिअसच्या पुढे टिकून आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील दोन दिवस राज्यात ढगाळ हवामान कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे थंडीत चढ-उतार होत राहणार असून काही भागांत पुन्हा थंडी वाढण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यात तापमानात लक्षणीय वाढ झाली असून विदर्भात काही जिल्ह्यांत तापमानात वाढ, तर काही ठिकाणी थंडीचा प्रभाव कायम आहे. पाहुयात, 16 जानेवारी रोजी राज्यातील तापमान आणि हवामानाची स्थिती कशी राहील.

advertisement
2/7
कोकण विभागात हवामान मुख्यतः निरभ्र राहणार आहे. मुंबईत कमाल तापमान सुमारे 32 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 17 अंश सेल्सिअस इतकं राहण्याची शक्यता आहे. सकाळी आणि रात्री हलका गारवा जाणवेल, मात्र दुपारच्या वेळी उकाडा जाणवण्याची शक्यता आहे.

3/7
पश्चिम महाराष्ट्रात पहाटे थंडी जाणवेल, त्यानंतर दिवसभर हवामान कोरडं राहणार आहे. पुणे शहरात सकाळच्या वेळेत धुक्याची शक्यता असून आकाश अंशतः निरभ्र राहील. येथे कमाल तापमान 30 अंश, तर किमान तापमान 14 अंश सेल्सिअस इतकं राहणार आहे.

4/7
मराठवाड्यात सकाळी थंड वातावरण राहील, त्यानंतर आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याचा अंदाज आहे. छत्रपती संभाजीनगर येथे कमाल तापमान 31 अंश, तर किमान तापमान 14 अंश सेल्सिअस इतकं राहील. ढगाळ वातावरणामुळे रात्रीचा गारवा काहीसा कमी झाल्याचं चित्र आहे.

5/7
उत्तर महाराष्ट्रात पहाटे गारवा जाणवण्याची शक्यता आहे. नाशिकमध्ये आकाश निरभ्र राहणार असून कमाल तापमान 28 अंश, तर किमान तापमान 15 अंश सेल्सिअस इतकं राहील. काही भागांत सकाळच्या वेळेत धुकं पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

6/7
विदर्भात थंडीचा प्रभाव काही प्रमाणात कायम असला तरी तापमानात चढ-उतार सुरू आहेत. नागपूरमध्ये कमाल तापमान 30 अंश, तर किमान तापमान 13 अंश सेल्सिअस इतकं राहण्याचा अंदाज आहे. आकाश मुख्यतः निरभ्र राहील, मात्र सकाळच्या वेळेत गारवा जाणवू शकतो.

7/7
दरम्यान, राज्यभरात हवामानातील बदलामुळे सर्दी, खोकला आणि ताप यांसारख्या आजारांचा धोका वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी बदलत्या हवामानानुसार आवश्यक ती काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे.

Dhule Election: भाजप कार्यकर्त्यांचा धिंगाणा, शिवीगाळ केली, ईव्हीएम मशीन फोडली, शिंदे गटाच्या आरोपाने खळबळ
भाजप कार्यकर्त्यांचा धिंगाणा, शिवीगाळ केली, ईव्हीएम मशीन फोडली, शिंदे गटाच्या आर
  • मतदान केंद्रावर मोठा गोंधळ झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

  • प्राथमिक विद्यामंदिरातील मतदान केंद्रात असलेल्या मतदान यंत्राची तोडफोड

  • भाजप कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्याचा आरोप शिंदे गटाने केला आहे.

View All
advertisement