Beauty Secret : पन्नाशीतही 30 चं कसं दिसावं? अभिनेत्री चित्रांगदाने सांगितलेलं ब्यूटी सीक्रेट 2 दिवसांत करेल जादू!
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Chitrangada Singh Beauty Secret : आपल्या सर्वांनाच हवे असते की, आपले केस निरोगी आणि दाट असावेत आणि चेहऱ्याची त्वचा नेहमी चमकदार राहावी. पण आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे, प्रदूषण, तणाव आणि चुकीच्या आहारामुळे त्वचा आणि केसांच्या आरोग्यावर अनेकदा परिणाम होतो. बाजारात हजारो प्रकारची ब्यूटी आणि हेअर प्रॉडक्ट्स उपलब्ध आहेत, पण तुम्हाला माहिती आहे का की काही घरगुती गोष्टीही केस आणि चेहऱ्यासाठी वरदान ठरू शकतात. विशेष म्हणजे यांचा वापर बॉलिवूड सेलिब्रिटीही करतात.
advertisement
advertisement
चित्रांगदा सिंहचे वय 50 वर्षे आहे, पण आजही ती तिच्या सौंदर्याने कोणत्याही तरुण अभिनेत्रीला मात देऊ शकते. नुकत्याच एका मुलाखतीत तिने तिच्या सुंदर केसांचा आणि ग्लोइंग स्किनचा सीक्रेट शेअर केला आहे. अभिनेत्रीने सांगितले की, ती त्या रोज सकाळी एक ग्लास जिरे पाणी पिते. हे तिच्या केस आणि त्वचेसाठी रामबाण ठरले आहे.
advertisement
advertisement
advertisement
अभिनेत्री एका व्हिडिओमध्ये सांगते की जिरे पाण्यात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन C असते, जे लवकर आजारी पडण्यापासून संरक्षण करते. हे प्यायल्याने घसा खवखवणे, संसर्ग, सर्दी-खोकला अशा समस्यांपासूनही आराम मिळतो. म्हणजेच ज्यांना वारंवार सर्दी-खोकला किंवा डोकेदुखीचा त्रास होतो, त्यांच्यासाठी हे ड्रिंक उत्तम आहे.
advertisement
advertisement
म्हणूनच जर तुम्हालाही चित्रांगदा सिंहसारखी उत्तम तब्येत, सुंदर केस आणि चमकदार त्वचा हवी असेल तर जिरे पाण्याचे सेवन करा. ते बनवणे खूप सोपे आहे. रात्री एक ग्लास पाण्यात एक चमचा जिरे भिजत घाला. सकाळी ते गाळून थोडे गरम करा. इच्छित असल्यास त्यात लिंबाचे काही थेंबही घालू शकता. नंतर हे ड्रिंक रिकाम्या पोटी चहासारखे प्या.
advertisement










