Exit Poll: 'वंचित फॅक्टर'चं काय होणार? मुंबईत चमत्कार घडवणार? एक्झिट पोलचे आकडे आले समोर
- Published by:Sachin S
Last Updated:
नगरपरिषद निवडणुकीमध्ये कमबॅक करणाऱ्या प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने सुद्धा मुंबईसह सगळ्याच महापालिकांमध्ये पूर्ण ताकदीने निवडणूक लढवली.
मुंबई : महाराष्ट्रात २९ महापालिका निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली आहे. बोटाला निघणारी शाई आणि दुबार मतदारांमुळे काही ठिकाणी वाद निर्माण झाले. त्या व्यतिरिक्त सर्वत्र शांतेत मतदान पार पडलं. या निवडणुकीसाठी सगळ्या पक्षांनी आपली ताकद पणाला लावली होती. खास करून नगरपरिषद निवडणुकीमध्ये कमबॅक करणाऱ्या प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने सुद्धा मुंबईसह सगळ्याच महापालिकांमध्ये पूर्ण ताकदीने निवडणूक लढवली. मुंबईत काँग्रेससोबत युती केली आहे. तर इतरही महापालिकेत बहुजन मतांच्या आधारावर वंचितने उमेदवार उभे केले होते. पण, एक्झिट पोलमध्ये वंचित फॅक्टरला धक्का बसला आहे. मुंबईत १ ते २ जागा मिळतील असा अंदाज वर्तवला आहे.
Jubilant Data Studio अर्थात JDS ने आपला अंदाज वर्तवला आहे. JDS ने २९ महापालिकांपैकी काहींचे अंदाज वर्तवले आहे. यामध्ये मुंबईत वंचित आघाडीने काँग्रेससोबत युती केली आहे. काँग्रेस आणि वंचित आघाडीला १६ ते २५ जागा मिळेल असा अंदाज वर्तवला आहे. यामध्ये वंचित आघाडीला भोपळाही फोडता येणार नाही असा अंदाज वर्तवलाा आहे. मुंबईत वंचितने ४६ ठिकाणी उमेदवार उभे केले आहे.
advertisement
तर लातूर आणि नांदेड महापालिकांमध्ये वंचित आघाडीने काँग्रेससोबत युती केली आहे. लातूर महापालिकेमध्ये वंचितला २ ते ३ जागा मिळतील, असा अंदाज वर्तवला आहे.
सोलापूर वंचित आघाडीचा मोठा प्रभाव आहे. लोकसभेत प्रकाश आंबेडक यांनी इथं निवडणूक लढवली होती. सोलापूर महापालिकेमध्ये सुजात आंबेडकर यांनी इथं विशेष लक्ष दिलं होतं. सोलापूर पालिकेमध्ये वंचितलाा २ ते ३ जागा मिळणार असा अंदाज JDS ने एक्झिट पोलमध्ये वर्तवला आहे.
advertisement
तर छत्रपती संभाजीनगर महापालिकेमध्येही वंचित आघाडीने आपले उमेदवार स्वबळावर उभे केले आहे. संभाजीनगरमध्ये एक्झिट पोलमध्ये अद्याप आकडे समोर आले नाही, पण या ठिकाणीही चमत्कार घडवण्याची शक्यता आहे.
या शिवाय, वंचित आघाडीने चंद्रपूर पालिकेमध्ये वंचित बहुजन आघाडीने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाशी आघाडी केली आहे. तर अकोला हे प्रकाश आंबेडकर यांचं होमग्राऊंड आहे. या ठिकाणी वंचित आघाडीने स्वबळावर निवडणूक लढवली आहे. तर अमरावती महापालिकेमध्येही वंचितने स्वबळावर निवडणूक लढवली आहे. या दोन्ही पालिकेच्या एक्झिट पोलचे आकडे अद्याप समोर आले नाही. मात्र, इथंही वंचित फॅक्टरला मतदार संधी देतील, अशी शक्यता आहे.
advertisement
(सविस्तर आकडे लवकरच अपडेट होतील)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 15, 2026 8:55 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Exit Poll: 'वंचित फॅक्टर'चं काय होणार? मुंबईत चमत्कार घडवणार? एक्झिट पोलचे आकडे आले समोर










