Morning Tips : सकाळची दहा मिनिटं स्वत:साठी द्या, पचन आणि मज्जासंस्थेचं काम होईल व्यवस्थित, वाचा सविस्तर

Last Updated:

आतड्यांसंबंधीच्या आरोग्य तज्ज्ञांच्या मते, तुम्ही कॉफी, चहा प्या, किंवा ईमेल पाहत किंवा मोबाईल स्क्रोलिंग करता करता दिवसाची सुरुवात करा पण याआधीच शरीरानं त्याची लय निश्चित केलेली असते. या वेळेचा सुज्ञपणे वापर केल्यानं मज्जासंस्था, पचन आणि चयापचयावर सकारात्मक परिणाम होऊ शकतात.

News18
News18
मुंबई : दिवसाची सुरुवात कशी होते यावर अवलंबून असतो आपला दिवस. प्रत्येकाच्या व्यापानुसार दिनचर्या ठरत असते.
दिवसाची निरोगी आणि सकारात्मक सुरुवात आपल्या शरीराला ऊर्जावान ठेवते. सकाळ म्हणजेच दिवसातला महत्त्वाचा पहिला भाग मज्जासंस्थेसाठी महत्त्वाचा असतो. याबाबत संशोधनही करण्यात आलं. आतड्यांसंबंधीच्या आरोग्य तज्ज्ञांच्या मते, तुम्ही कॉफी, चहा प्या, किंवा ईमेल पाहत किंवा मोबाईल स्क्रोलिंग करता करता दिवसाची सुरुवात करा पण याआधीच शरीरानं त्याची लय निश्चित केलेली असते. या वेळेचा सुज्ञपणे वापर केल्यानं मज्जासंस्था, पचन आणि चयापचयावर सकारात्मक परिणाम होऊ शकतात.
advertisement
यासाठी एक दोन तासांची नाही; तर केवळ दहा मिनिटांची दिनचर्या पुरेशी आहे. ही दहा मिनिटांची सकाळची दिनचर्या निरोगी आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी कशी प्रभावी आहे ते समजून घेऊया.
हळूहळू श्वास घ्या - पहिली तीन मिनिटं हळूहळू आणि खोल श्वास घ्या. जलद आणि उथळ श्वासोच्छवासामुळे शरीरावर ताण येतो, ज्यामुळे पचनक्रियेवर परिणाम होतो. हळूहळू श्वास घेतल्यानं पॅरासिम्पेथेटिक मज्जासंस्था सक्रिय होते, ज्यामुळे शरीर शांत होतं आणि पचन सुधारतं. ही खोल श्वास सोडण्याची पद्धत ताण संप्रेरक कमी करते आणि आतड्यांना अन्नासाठी तयार करते. अ‍ॅरिझोना सेंटर फॉर इंटिग्रेटिव्ह मेडिसिनचे संस्थापक डॉ. अँड्र्यू वेइल यांच्या संशोधनातून हे निदर्शनास आलं.
advertisement
हलकी हालचाल - पुढची दोन ते तीन मिनिटं थोडं स्ट्रेचिंग किंवा थोडं चाला. यामुळे मेंदू, हृदय आणि पचनसंस्थेला जोडणारी व्हॅगस नर्व्ह सक्रिय होते. गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजिस्ट आणि फायबर फ्युएल्डचे लेखक डॉ. विल बुल्सिविझ यांच्या मते, हालचालीमुळे आतड्यांची हालचाल सुधारून पचनाला मदत होते.
advertisement
हलक्या हालचालीमुळे आतड्यांची हालचाल सुधारते आणि पोट फुगण्याचं प्रमाण कमी होतं. पाठीच्या कण्यासाठीचे काही व्यायाम करणं किंवा थोडं चालणं पुरेसं आहे.
हायड्रेशन - सातव्या ते आठव्या मिनिटांच्या दरम्यान पाणी प्या. झोपून उठल्यानंतर शरीराला पुन्हा हायड्रेट करणं महत्वाचं आहे. कॅफिन घेण्यापूर्वी पाणी पिणं चांगलं, कारण रिकाम्या पोटी कॉफीमुळे ताण वाढण्याची शक्यता असते. कोमट किंवा साधं पाणी पिणं हा उत्तम पर्याय आहे.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Morning Tips : सकाळची दहा मिनिटं स्वत:साठी द्या, पचन आणि मज्जासंस्थेचं काम होईल व्यवस्थित, वाचा सविस्तर
Next Article
advertisement
Dhule Election: भाजप कार्यकर्त्यांचा धिंगाणा, शिवीगाळ केली, ईव्हीएम मशीन फोडली, शिंदे गटाच्या आरोपाने खळबळ
भाजप कार्यकर्त्यांचा धिंगाणा, शिवीगाळ केली, ईव्हीएम मशीन फोडली, शिंदे गटाच्या आर
  • मतदान केंद्रावर मोठा गोंधळ झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

  • प्राथमिक विद्यामंदिरातील मतदान केंद्रात असलेल्या मतदान यंत्राची तोडफोड

  • भाजप कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्याचा आरोप शिंदे गटाने केला आहे.

View All
advertisement