Planks : दिवसाची सुरुवात करा प्लांक व्यायामानं, स्नायू होतील मजबूत, लवचिकताही वाढेल, पाहूया प्लांकचे आणखी फायदे
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
दररोज सकाळी एक मिनिट प्लँक्स केल्यानं कोअर स्नायू मजबूत होतात, पोटाची चरबी कमी होते, शरीराचं संतुलन सुधारतं, पाठ, खांदे आणि हात मजबूत होतात, मूड सुधारतो आणि लवचिकता वाढते, ज्यामुळे एकूणच फिटनेस सुधारतो आणि शरीराचं टोनिंग होतं. ताण कमी करण्यासाठीही या व्यायामाची मदत होते.
मुंबई : आरोग्यासाठी जसा आहार महत्त्वाचा तसाच महत्त्वाचा आहे व्यायाम. दिवसाची सुरुवात निरोगी आणि तंदुरुस्त पद्धतीनं केल्यानं शरीर दिवसभर सक्रिय राहतं आणि आजारांपासून शरीराचं रक्षण होतं. सकाळी लवकर व्यायाम करणं आरोग्यासाठी फायदेशीर मानलं जातं.
व्यस्त दिनचर्येमुळे कमी वेळ मिळत असेल, तर या एका मिनिटांच्या व्यायमाचं महत्त्व समजून घ्या. कारण, व्यायाम नसेल तर शरीरात नेहमीच उर्जेचा अभाव असतो आणि अशक्तपणा कायम राहतो.
दररोज सकाळी एक मिनिट प्लँक्स केल्यानं कोअर स्नायू मजबूत होतात, पोटाची चरबी कमी होते, शरीराचं संतुलन सुधारतं, पाठ, खांदे आणि हात मजबूत होतात, मूड सुधारतो आणि लवचिकता वाढते, ज्यामुळे एकूणच फिटनेस सुधारतो आणि शरीराचं टोनिंग होतं. ताण कमी करण्यासाठीही या व्यायामाची मदत होते.
advertisement
कोअर स्नायूंची बळकटी - प्लँकमुळे पोटाचे स्नायू, पाठ आणि कंबरेचे स्नायू मजबूत करायला मदत होते, यामुळे शरीरासाठी मजबूत पाया तयार होतो.
पोटाची चरबी - पोटाची चरबी कमी करण्यासाठी आणि पोट घट्ट करण्यासाठी हा व्यायाम खूप प्रभावी आहे.
advertisement
सुधारित पोश्चर - यामुळे तुमचं पोश्चर सुधारतं आणि मणक्याला आधार मिळतो, जास्त वेळ बसल्यामुळे होणाऱ्या वेदना कमी करण्यासाठी यामुळे मदत होते.
मूड आणि ताण - प्लँक्समुळे एंडोर्फिन संप्रेरक रिलीज होतं, यामुळे मूड सुधारतो आणि ताण आणि चिंता कमी करायला मदत होते.
लवचिकता आणि संतुलन - हॅमस्ट्रिंग्ज म्हणजे मांडीचा मागचा भाग आणि पाय चांगले ताणले जातात, ज्यामुळे लवचिकता आणि संतुलन सुधारायला मदत होते.
advertisement
एक मिनिटाच्या प्लँकमुळे किती कॅलरीज बर्न होतात ?
सरासरी, एक मिनिटाच्या प्लँकमुळे शरीराचं वजन आणि स्नायूंच्या सक्रियतेवर अवलंबून दोन ते पाच कॅलरीज बर्न होतात. जड व्यक्तींना स्वतःला स्थिर ठेवण्यासाठी जास्त उर्जेची आवश्यकता असते, म्हणून ते जास्त कॅलरीज बर्न करतात. उदाहरणार्थ, 68 किलो वजनाची व्यक्ती प्रति मिनिट सुमारे तीन कॅलरीज बर्न करते. 84 किलो वजनाची व्यक्ती प्रति मिनिट सुमारे 4 ते 5 कॅलरीज बर्न करते. 'प्लँक जॅक' किंवा 'माउंटन क्लाइंबर्स' सारखे डायनॅमिक प्लँक्स नियमित प्लँक्सपेक्षा जास्त कॅलरीज बर्न करतात.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 16, 2026 12:46 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Planks : दिवसाची सुरुवात करा प्लांक व्यायामानं, स्नायू होतील मजबूत, लवचिकताही वाढेल, पाहूया प्लांकचे आणखी फायदे










