नाशिकमधून मोठा निकाल हाती! भाजपच्या सुधाकर बडगुजरांचा विजय
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Nashik Election 2026 : नाशिक महानगरपालिकेच्या निवडणूक निकालात मोठ्या राजकीय घडामोडी समोर आल्या असून, प्रभाग क्रमांक २५ मध्ये भाजपने भक्कम यश मिळवले आहे. या प्रभागात भाजपचे सुधाकर बडगुजर यांनी मोठ्या फरकाने विजय मिळवला असून, त्यांच्या सहकारी उमेदवार साधना मटाले यांनाही मतदारांनी विजयी केले आहे.
नाशिक : महानगरपालिकेच्या निवडणूक निकालात मोठ्या राजकीय घडामोडी समोर आल्या असून, प्रभाग क्रमांक २५ मध्ये भाजपने भक्कम यश मिळवले आहे. या प्रभागात भाजपचे सुधाकर बडगुजर यांनी मोठ्या फरकाने विजय मिळवला असून, त्यांच्या सहकारी उमेदवार साधना मटाले यांनाही मतदारांनी विजयी केले आहे. या निकालामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. याच प्रभागातील उर्वरित दोन जागांवर शिवसेना शिंदे गटाच्या कविता नाईक आणि शिवसेना ठाकरे गटाचे मुरलीधर भांबरे यांनी विजय मिळवला आहे.
शिंदे गटाचे खाते उघडले, चार जागांवर विजय
दरम्यान, शिवसेना शिंदे गटानेही महापालिका निवडणुकीत दमदार सुरुवात केली आहे. प्रभाग क्रमांक १६ मधून राहुल दिवे, आशा तडवी, पूजा नवले आणि ज्योती जोंधळे यांनी विजय मिळवत शिंदे गटाचे खाते चार जागांवर उघडले आहे. या यशामुळे शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून, पुढील जागांबाबत आशा वाढल्या आहेत.
advertisement
पावणेचार वर्षांची प्रतीक्षा संपली
तब्बल पावणेचार वर्षांपासून रखडलेली नाशिक महानगरपालिकेची निवडणूक अखेर निर्णायक टप्प्यावर पोहोचली आहे. गुरुवारी (दि. १५ जानेवारी) शहरात मतदान प्रक्रिया पार पडली आणि आज या निवडणुकीचा निकाल जाहीर होत आहे. दीर्घ प्रतीक्षेनंतर झालेल्या या निवडणुकीकडे संपूर्ण नाशिक शहराचे लक्ष लागले होते. विशेष म्हणजे १२२ पैकी १५ प्रभागांमध्ये अत्यंत अटीतटीची लढत पाहायला मिळाल्याने निकालाबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली होती.
advertisement
१२२ जागांसाठी ७३५ उमेदवार मैदानात
नाशिक महापालिकेच्या ३१ प्रभागांतील १२२ जागांसाठी ही निवडणूक पार पडली. या निवडणुकीत एकूण ७३५ उमेदवारांनी आपले नशीब आजमावले. भाजपकडून सर्वाधिक ३८ माजी नगरसेवक निवडणूक रिंगणात उतरले होते. त्याखालोखाल शिवसेना शिंदे गटाकडून ३० माजी नगरसेवक मैदानात होते. एकूण ८७ माजी नगरसेवक पुन्हा एकदा मतदारांसमोर गेले असून, त्यापैकी सहा माजी नगरसेवक अपक्ष म्हणून निवडणूक लढवत होते.
advertisement
भाजप विरुद्ध शिंदेसेना थेट लढत
या निवडणुकीत १२२ पैकी तब्बल ९६ जागांवर भाजप आणि शिवसेना शिंदे गटामध्ये थेट सामना रंगला. भाजपने स्वबळावर निवडणूक लढवली, तर शिवसेना शिंदे गटाने राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), रिपब्लिकन सेना यांच्यासोबत युती केली होती. दुसरीकडे महाविकास आघाडीनेही आपली ताकद पणाला लावली. भाजप, शिंदेसेना, राष्ट्रवादी अजित पवार गट, शिवसेना ठाकरे गट, मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्यासह तब्बल २०८ अपक्ष उमेदवारही निवडणूक रिंगणात होते.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Nashik,Maharashtra
First Published :
Jan 16, 2026 12:57 PM IST








