दिलासा कधी मिळणार? कल्याण-मुरबाड मार्गावरील 'त्या' अडथळ्यामुळे प्रवाशांचा संताप अनावर

Last Updated:

Murbad–Kalyan ST Bus : मुरबाड-कल्याण मार्गावर मोठी प्रवासी संख्या असूनही एसटी बस अपुऱ्या आहेत. गर्दीच्या वेळेत बस न मिळाल्याने प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत असून जलद एसटी बस सुरू करण्याची मागणी होत आहे.

News18
News18
कल्याण : मुरबाड ते कल्याण हा राज्य परिवहन महामंडळाच्या मुरबाड आगारातील सर्वाधिक गर्दीचा आणि उत्पन्न देणारा मार्ग आहे. दररोज ग्रामीण भागातून तसेच शहरातून शेकडो प्रवासी या मार्गावरून प्रवास करतात. मुरबाड, कल्याण, ठाणे आणि मुंबई येथे नोकरी, व्यवसाय आणि शिक्षणासाठी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे.
कल्याण-मुरबाड एसटी प्रवासाची दैना
इतकी रोजची गर्दी असूनही या मार्गावर पुरेशा एसटी बस गाड्या उपलब्ध नसल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतहा मुरबाडहून सकाळी 7 ते 10 आणि कल्याणहून सायंकाळी 5 ते रात्री 10 या गर्दीच्या वेळेत बसची संख्या अपुरी असल्याची तक्रार आहे. वेळेवर बस न मिळाल्याने अनेक प्रवाशांना खासगी इको, कार किंवा जीपने प्रवास करावा लागतो.
advertisement
बस अभावी सवलतीचा लाभ मिळेना
यामुळे प्रवासाचा खर्च वाढत असून सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना एसटी बसमध्ये 50 टक्के तिकीट सवलत मिळते. मात्र बसच उपलब्ध नसल्याने या प्रवाशांना सवलतीचा लाभ घेता येत नाही आणि महागडा प्रवास करावा लागतो. एसटी कर्मचाऱ्यांच्या मते मुरबाड- कल्याण मार्गावरील बस सर्व थांब्यांवर थांबत असल्याने थेट प्रवास करणारे प्रवासी इतर पर्याय निवडतात. त्यामुळे बस असूनही अपेक्षित प्रवासी मिळत नाहीत.
advertisement
गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेल्या रस्त्याच्या रुंदीकरण आणि काँक्रिटीकरणाचे बहुतांश काम आता पूर्ण झाले आहे. त्यामुळे बस वेळेत पोहोचू शकतात. या पार्श्वभूमीवर दिवसभरात बस फेऱ्या वाढवाव्यात तसेच मुरबाड आणि कल्याण आगारातून विना वाहक जलद एसटी बस सुरू कराव्यात, अशी जोरदार मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.
view comments
मराठी बातम्या/Kalyan Dombivli/
दिलासा कधी मिळणार? कल्याण-मुरबाड मार्गावरील 'त्या' अडथळ्यामुळे प्रवाशांचा संताप अनावर
Next Article
advertisement
BMC Election Result 2026 : मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की ठाकरे बंधू? पाहा कोण आघाडीवर
मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की ठाकरे बंधू? पाहा कोण आघाडीवर
  • मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की महाविकास आघाडी? पाह

  • मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) सत्तेचा फैसला आज

  • सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात झाली

View All
advertisement