Mental Health : ऋतिक रोशनने मेंटल हेल्थबाबत केली पोस्ट, सांगितला इमोशनचा 90 सेकंद नियम; नेमका आहे का?

Last Updated:

Hrithik Roshan talk about mental health : या लेटेस्ट पोस्टमध्ये ऋतिक रोशनने अचानक येणाऱ्या नैराश्याला कसे सामोरे जायचे याबाबत सांगितले आहे. ऋतिकने इंस्टाग्राम पोस्टमध्ये सकाळी अचानक येणारे नैराश्य आणि भावनांबाबत मोकळेपणाने लिहिले आहे.

मेंटल हेल्थवर ऋतिकची इंस्टा पोस्ट
मेंटल हेल्थवर ऋतिकची इंस्टा पोस्ट
मुंबई : बॉलिवूड अभिनेता आणि जगातील सर्वात देखण्या पुरुषांमध्ये गणला जाणारा ऋतिक रोशन सोशल मीडियावर फिटनेस, मेंटल हेल्थ आणि लाईफ लर्निंगबाबत सातत्याने पोस्ट करत असतो. त्याच्या या पोस्टचा लोकांवर भरपूर परिणाम होतो. नुकताच अभिनेत्याने भावना म्हणजेच इमोशन्स कशा प्रकारे मॅनेज करावे यावर एक पोस्ट केली आहे. यामुळे तो सध्या चांगलाच चर्चेत आला आहे.
या लेटेस्ट पोस्टमध्ये ऋतिक रोशनने अचानक येणाऱ्या नैराश्याला कसे सामोरे जायचे याबाबत सांगितले आहे. ऋतिकने इंस्टाग्राम पोस्टमध्ये सकाळी अचानक येणारे नैराश्य आणि भावनांबाबत मोकळेपणाने लिहिले आहे. पोस्टची सुरुवात त्याने मजेशीर शैलीत “इशारा : विनाकारण सकाळची बडबड” (Statutory Warning : senseless #morningrant) असे लिहून केली.
मेंटल हेल्थवर ऋतिकची इंस्टा पोस्ट
ऋतिकने लिहिले की, चांगला काळ गेल्यानंतर अचानक जगातील सगळ्या वाईट गोष्टी समोर येऊ लागतात. चांगल्या गोष्टीदेखील आपली दुसरी, नकारात्मक बाजू दाखवू लागतात आणि दिवस वेगाने पुढे सरकतो. तो म्हणतो की आपण किती हुशारीने या भावनांना तोडून मोडून स्वतःचे सिद्धांत बनवतो. कारण शोधतो आणि उपाय सुचवतो, पण तरीही या विचित्र, निरर्थक उदासीनतेतून स्वतःला बाहेर काढू शकत नाही. ही उदासीनता म्हणजेच नैराश्य कोणतीही पूर्वसूचना न देता आपल्याला आपल्या विळख्यात घेते.
advertisement
जगाला म्हटले देखावा
ऋतिक पुढे म्हणतो की, तो आपल्या सध्याच्या भावना शब्दांत मांडत आहे. मोठमोठ्या शब्दांच्या साहाय्याने नैराश्य लपवण्याचा प्रयत्न करत आहे आणि ते आकर्षक पद्धतीने सादर करत आहे. त्याने जगाच्या या अवस्थेबद्दल चिंता व्यक्त केली, जिथे निरर्थक गोष्टी इतक्या सुंदरपणे मांडल्या जातात की, त्या महत्त्वाच्या आणि तर्कसंगत वाटू लागतात.
advertisement



 










View this post on Instagram























 

A post shared by Hrithik Roshan (@hrithikroshan)



advertisement
इमोशनचे शास्त्र
अभिनेत्याने विज्ञानाचाही उल्लेख केला आहे. न्यूरोसायंटिस्ट डॉ. जिल बोल्टे टेलर यांच्या मते, कोणतीही भावना आपल्या शुद्ध स्वरूपात केवळ 90 सेकंद टिकते. त्यानंतर ती बदलते किंवा दुसऱ्या भावनेत मिसळते, त्यामुळे जास्त विचार करण्याचा काहीच अर्थ नाही. त्याने लिहिले, 'यासाठी मला 45 सेकंद लागले, अजून 45 सेकंद बाकी आहेत.' पोस्टच्या शेवटी त्याने त्या लोकांना टॅग केले आहे, ज्यांना ही विचित्र पोस्ट समजणार नाही किंवा जे नंतर निराश होतील, दुखावले जाती. तो म्हणतो, “माझ्या मित्रांनो, तुम्ही खरंच आयुष्य तसंच जगत आहात, जसं ते जगायला हवं.”
advertisement
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
Click here to add News18 as your preferred news source on Google.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Mental Health : ऋतिक रोशनने मेंटल हेल्थबाबत केली पोस्ट, सांगितला इमोशनचा 90 सेकंद नियम; नेमका आहे का?
Next Article
advertisement
BMC Election Result 2026 : मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की ठाकरे बंधू? पाहा कोण आघाडीवर
मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की ठाकरे बंधू? पाहा कोण आघाडीवर
  • मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की महाविकास आघाडी? पाह

  • मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) सत्तेचा फैसला आज

  • सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात झाली

View All
advertisement