थकबाकीदारांनो, 'ही' संधी सोडू नका! पाणीपट्टीत मिळणार 'इतकी' सूट, कोल्हापूर महापालिकेची मोठी घोषणा
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
Kolhapur News : पाणीपट्टीची थकबाकी असलेल्या नागरिकांसाठी कोल्हापूर महानगरपालिकेने एक मोठा दिलासा दिला आहे. ९ ते ३० सप्टेंबर २०२५ या कालावधीत थकीत पाणीपट्टीची...
Kolhapur News : पाणीपट्टीची थकबाकी असलेल्या नागरिकांसाठी कोल्हापूर महानगरपालिकेने एक मोठा दिलासा दिला आहे. ९ ते ३० सप्टेंबर २०२५ या कालावधीत थकीत पाणीपट्टीची संपूर्ण रक्कम एकरकमी भरल्यास, विलंब आकारात तब्बल ९० टक्के सवलत दिली जाणार आहे. प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष योजना राबविण्यात येत आहे.
योजनेचा तपशील
पहिला टप्पा (९ ते ३० सप्टेंबर २०२५) : या काळात थकबाकीदार नागरिक त्यांच्या सर्व बिलांची रक्कम एकाच वेळी भरल्यास विलंब आकारामध्ये ९०% सूट मिळेल.
दुसरा टप्पा (१ ते ३१ ऑक्टोबर २०२५) : यानंतरही बिल भरल्यास, त्यांना ७५% सवलत मिळेल.
महापालिका दरवर्षी वेळेत बिल न भरणाऱ्या नागरिकांना १०% दराने विलंब शुल्क आकारते. मोठ्या प्रमाणावर थकबाकी जमा झाल्यामुळे अनेकदा नळ कनेक्शन कापले जातात किंवा मालमत्तेवर बोजा नोंदवला जातो. मात्र, या सवलतीमुळे नागरिकांना या कारवाईपासून वाचता येणार आहे.
advertisement
बिल भरण्याच्या सोयीस्कर पद्धती
- तुम्ही रोख, धनादेश (Cheque) किंवा डिमांड ड्राफ्ट (DD) द्वारे बिल भरू शकता.
- ऑनलाइन भरण्यासाठी महापालिकेच्या अधिकृत वेबसाइट https://web.kolhapurcorporation.gov.in किंवा अँड्रॉइड ॲपचा वापर करता येईल.
- याशिवाय, नागरी सुविधा केंद्रांमधील किओस्क यंत्रांवरूनही बिल भरता येईल.
या योजनेचा लाभ शासकीय कार्यालयेही घेऊ शकतात. २००८-०९ पूर्वी बंद झालेले नळ कनेक्शनही नव्या प्रणालीत नोंदवून या सवलतीसाठी पात्र ठरतील. मात्र, या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित सर्व दावे किंवा तक्रारी मागे घ्याव्या लागतील. महापालिकेने थकबाकी भरून कारवाईपासून वाचण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.
advertisement
हे ही वाचा : Sangli News: 41 हजारांचा नारळ अन् 20 हजारांची कोथिंबीर जुडी! या गावात पार पडला अनोखा लिलाव, एवढं महाग का?
हे ही वाचा : हिरवा, निळा, पिवळा... आकर्षक दिसणाऱ्या या 'सुरवंटा'पासून राहा दूर, कारण वाचून धक्का बसेल
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 09, 2025 12:12 PM IST
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
थकबाकीदारांनो, 'ही' संधी सोडू नका! पाणीपट्टीत मिळणार 'इतकी' सूट, कोल्हापूर महापालिकेची मोठी घोषणा