हिरवा, निळा, पिवळा... आकर्षक दिसणाऱ्या या 'सुरवंटा'पासून राहा दूर, कारण वाचून धक्का बसेल

Last Updated:

Sangli News : पावसाळा सुरू झाला की निसर्ग अनेक रंगांची उधळण करतो. याच रंगांच्या दुनियेत शिराळा तालुक्यातील गिरजवडे गावाजवळील दंडस्नान...

Nettle Caterpillar
Nettle Caterpillar
Sangli News : पावसाळा सुरू झाला की निसर्ग अनेक रंगांची उधळण करतो. याच रंगांच्या दुनियेत शिराळा तालुक्यातील गिरजवडे गावाजवळील दंडस्नान रस्त्यावर एक अतिशय आकर्षक सुरवंट आढळून आला आहे. हिरव्या, निळ्या, पिवळ्या आणि नारंगी रंगांच्या छटांनी सजलेला हा सुरवंट पाहण्यासाठी अनेकांनी गर्दी केली. मात्र, कीटकशास्त्रज्ञांच्या मते, हा सुंदर दिसणारा जीव प्रत्यक्षात 'नेटल सुरवंट' (Nettle Caterpillar) असून तो अत्यंत धोकादायक आहे.
'नेटल सुरवंट' म्हणजे काय?
हा एका विशिष्ट प्रकारच्या पतंगाचा सुरवंट आहे. त्याच्या अंगावर असलेले काटेरी केस केवळ आकर्षक दिसत नाहीत, तर त्यात सूक्ष्म प्रमाणात विषारी द्रव असते. स्वसंरक्षणासाठी तो या विषाचा वापर करतो. काही ठिकाणी त्याला 'घोणस अळी' असेही म्हणतात. शास्त्रीय भाषेत त्याला Parasa lepida किंवा Slug Moth Caterpillar म्हणून ओळखले जाते. भारत आणि आशियातील काही उष्णकटिबंधीय प्रदेशांमध्ये तो आढळतो.
advertisement
हा धोकादायक का आहे?
या सुरवंटाच्या अंगावरील काट्यांचा चुकूनही स्पर्श झाल्यास व्यक्तीला तीव्र वेदना, जळजळ आणि खाज येते. काही प्रकरणांमध्ये त्वचेवर लाल रंगाचे चट्टे किंवा फोड येऊ शकतात. ज्यांना ॲलर्जीचा त्रास आहे, त्यांना याचा दंश अधिक त्रासदायक ठरू शकतो. त्यामुळे, हा सुरवंट कितीही सुंदर दिसत असला, तरी त्यापासून दूर राहणेच योग्य आहे.
advertisement
काळजी कशी घ्यावी?
  • हा सुरवंट दिसल्यास त्याच्यापासून पुरेसे अंतर ठेवा.
  • मुलांना त्याला स्पर्श करू नये, यासाठी सावध करा.
  • जर चुकून स्पर्श झाला, तर तात्काळ चिकट टेप त्वचेवर लावून काटे काढून टाका आणि तो भाग साबणाच्या पाण्याने धुवा.
  • जळजळ कमी करण्यासाठी बर्फ लावू शकता. त्रास वाढत असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.
advertisement
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
हिरवा, निळा, पिवळा... आकर्षक दिसणाऱ्या या 'सुरवंटा'पासून राहा दूर, कारण वाचून धक्का बसेल
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement