अनोखं गाव! या 2 निर्णयांमुळे चांगलंच चर्चेत आलंय 'हे' गाव; नियम ऐकाल तर तुम्हीही कौतुक कराल
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
Chhatrapati Sambhajinagar : सोयगाव तालुक्यातील जरंडी गावाने एक अनोखा आणि स्तुत्य निर्णय घेऊन देशासमोर एक आदर्श ठेवला आहे. गावातील नुकत्याच...
Chhatrapati Sambhajinagar : सोयगाव तालुक्यातील जरंडी गावाने एक अनोखा आणि स्तुत्य निर्णय घेऊन देशासमोर एक आदर्श ठेवला आहे. गावातील नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत, नवविवाहित जोडप्यांना विवाह नोंदणीसाठी कमीत कमी पाच झाडे लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. यासोबतच राष्ट्रगीत आणि सायंकाळी टीव्ही-मोबाईल बंद ठेवण्यासारखे अनेक महत्त्वपूर्ण ठराव एकमताने मंजूर करण्यात आले आहेत.
'झाड लावा, विवाह नोंदणी प्रमाणपत्र मिळवा'
गावाच्या सरपंच स्वाती पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या ग्रामसभेत हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. आता जरंडी गावातील कोणत्याही नवविवाहित जोडप्याला विवाह नोंदणी प्रमाणपत्र हवे असेल, तर त्यांना गावामध्ये कुठेही रस्त्याच्या कडेला पाच झाडे लावावी लागतील. या झाडांचे फोटो ग्रामपंचायतीकडे सादर केल्यानंतरच त्यांना प्रमाणपत्र दिले जाईल. यामुळे गावात पर्यावरण संवर्धनाची भावना वाढेल अशी अपेक्षा आहे.
advertisement
देशभक्ती आणि संवाद वाढवण्याचा प्रयत्न
केवळ पर्यावरणाचेच नाही, तर देशभक्ती आणि सामाजिक सलोख्याचेही भान या ग्रामसभेत ठेवण्यात आले. गावकऱ्यांमध्ये देशभक्तीची भावना रुजावी यासाठी दररोज सकाळी 9 वाजता ग्रामपंचायतीच्या स्पीकरवरून राष्ट्रगीत वाजवले जाणार आहे. यासोबतच, कुटुंबातील संवाद आणि सामाजिक एकोपा वाढवण्यासाठी आणखी एक महत्त्वाचा ठराव चर्चेला आला. दररोज संध्याकाळी 6 ते 8 या वेळेत गावातील सर्व टीव्ही आणि मोबाईल बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. या दोन तासांमध्ये लोक एकमेकांशी संवाद साधतील आणि गावातील सामाजिक बंध अधिक मजबूत होतील, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला.
advertisement
हे ही वाचा : Pune News : 200 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अखेर यश मिळालं; पुण्यातील 'या' प्रसिद्ध भागाचे नाव बदलले
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 09, 2025 10:01 AM IST
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
अनोखं गाव! या 2 निर्णयांमुळे चांगलंच चर्चेत आलंय 'हे' गाव; नियम ऐकाल तर तुम्हीही कौतुक कराल