advertisement

बुलढाण्यात सुपारी देऊन शिक्षिकेचा खून, पतीनेच रचला खूनी खेळ, कांड बघून पोलीसही चक्रावले

Last Updated:

बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद पोलीस स्टेशनच्या हद्दीत झालेल्या अपघातात ठार झालेल्या शिक्षिकेच्या मृत्यूप्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे.

News18
News18
राहुल खंडारे, प्रतिनिधी बुलढाणा: बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद पोलीस स्टेशनच्या हद्दीत झालेल्या अपघातात ठार झालेल्या शिक्षिकेच्या मृत्यूप्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे. सकाळी शाळेत जाण्यासाठी निघालेल्या शिक्षिकेचा एका रस्ते अपघातात निधन झालं होतं. त्यांना मालवाहू ट्रकने उडवलं होतं. प्रथमदर्शनी हा अपघात वाटत होता. मात्र आता या घटनेच्या सात दिवसानंतर पोलिसांनी या अपघाताचं गूढ उलगडलं आहे. हा अपघात नसून घातपात असल्याचं पोलिसांनी समोर आणलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे ही हत्या दुसरी तिसरी कुणी नव्हे तर शिक्षिकेच्या पतीनेच सुपारी देऊन घडवून आणल्याचं समोर आलं आहे.
नेमकं प्रकरण काय?
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 2 मार्च रोजी पातुर्डा येथे राहणाऱ्या शिक्षिका वृषाली गावंडे ह्या पिंपळगाव काळे येथे नेहमी प्रमाणे शाळेत जाण्यासाठी निघाल्या होत्या. कवठळ गावाजवळून जात असताना एका मालवाहू वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात शिक्षिका वृषाली यांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी ही तशा पद्धतीने मृत्यूची नोंद केली.
advertisement
मात्र महिलेच्या नातेवाईकांना या प्रकरणी संशय आल्याने त्यांनी पोलिसांकडे याबाबत घातपाताचा संशय व्यक्त केला. पोलिसांनीही तपास चक्रे फिरवत तांत्रिक पुराव्यांच्या आधारे हा मृत्यू साधारण अपघातात झाला नसल्याचं निष्पन्न केलं. या अपघातात मृत्यू पावलेल्या शिक्षिका वृषाली गावंडे यांचा खून त्यांचे पती प्रकाश गावंडे यांनी सुपारी देऊन घडवून आणल्याची धक्कादायक माहिती पोलिसांनी तपासातून उघडकीस आणली.
advertisement
आरोपी प्रकाश गावंडे याने गावातीलच मित्र मंगेश चौहुलकर याच्या मदतीने वाहन चालक मनीष सूर्यवंशी याला 1 लाख रुपयांची सुपारी देऊन पत्नीचा खून केला आहे. पोलिसांनी या तीनही आरोपींना वाहन आणि सुपारी म्हणून दिलेल्या रकमेसह अटक केली आहे. एका शिक्षिकेला मारण्यासाठी तिच्याच नवऱ्याने अशाप्रकारे खूनी खेळ केल्याने संपूर्ण बुलढाणा जिल्हा हादरला आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
बुलढाण्यात सुपारी देऊन शिक्षिकेचा खून, पतीनेच रचला खूनी खेळ, कांड बघून पोलीसही चक्रावले
Next Article
advertisement
Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement