Tips And Tricks : फ्लाइट बुक करताना 'या' ट्रिक्स फॉलो करा; कमी किमतीत मिळेल तिकीट, वाचतील भरपूर पैसे
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
How to get flight ticket in cheap rate : उन्हाळयाच्या सुट्ट्यात बरेच लोक फिरायला जातात. डेस्टिनेशन भारतातलं असो की, भारताबाहेरचं बरेच लोक विमानाने प्रवास करणं निवडतात. मात्र बऱ्याचदा आपण कोणतेही हॅक्स न वापरता सरळ तिकीट बुक करतो तेव्हा आपल्याला तिकिटाचे पैसे पूर्ण भरावे लागतात. पण आज आम्ही तुम्हाला यासाठी काही टिप्स देत आहोत.
advertisement
ही ट्रिक खूप भन्नाट आहे. फ्लाईट बुकिंग करताना इनकॉग्निटो मोड वापरा. कारण जेव्हा वारंवार फ्लाइट किंवा हॉटेल शोधले जातात, तेव्हा ब्राउझर कुकीज तुमची सर्च हीस्ट्री ट्रॅक करतात. यामुळं तिकिटांचे दर वाढतात. म्हणून बुकिंग इनकॉग्निटो मोडमध्ये किंवा खाजगी ब्राउझिंगमध्ये करा. यामुळे एअरलाइन्सना तुमचे सर्चेस दिसत नाही आणि तुम्हाला तिकीट कमी किमतीत मिळतं.
advertisement
ही ट्रिक तशी सर्वांसाठीच सोयीची आहे असं नाही. पण ज्या लोकांना फिरायला आवडतं आणि ते कधीही फिरू शकतात. त्यांना ही कमी येऊ शकते. कोणत्याही पर्यटन स्थळाचा पीक सीजन असतात तिथे जाऊ नका. ऑफ सीजन किंवा पीक सिजनमध्ये प्रवास करा. कारण तेव्हा गर्दी कमी असते. अशावेळी तुम्हाला हॉटेल्स आणि फ्लाइट तिकीटाची स्वस्तात मिळतात. यावेळी तुमचे पैसेही वाचतील आणि जास्त गर्दी राहणार नाही.
advertisement
advertisement
advertisement
advertisement








