advertisement

BMC : मुंबई महापालिकेत ३८५ कोटींचा 'रेलिंग' घोटाळा? भाजपच्या एका पत्रानंतर निविदाच रद्द, प्रकरण काय?

Last Updated:

BMC Tender: आता मुंबईतील फूटपाथवर रेलिंग बसवण्यासाठी काढलेली ३८५ कोटी रुपयांची निविदा अवघ्या काही तासांतच रद्द करण्याची नामुष्की प्रशासनावर ओढवली आहे.

मुंबई महापालिकेत ३८५ कोटींचा 'रेलिंग' घोटाळा? भाजपच्या एका पत्रानंतर निविदाच रद्द, प्रकरण काय?
मुंबई महापालिकेत ३८५ कोटींचा 'रेलिंग' घोटाळा? भाजपच्या एका पत्रानंतर निविदाच रद्द, प्रकरण काय?
मुंबई: मुंबई महानगरपालिकेत सध्या निविदा आणि घोटाळ्यांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाहीये. प्रशासक असताना मुंबई महापालिकेच्या काही निविदांवर आक्षेप घेण्यात आला होता. शिवसेना ठाकरे गटाने घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आता मुंबईतील फूटपाथवर रेलिंग बसवण्यासाठी काढलेली ३८५ कोटी रुपयांची निविदा अवघ्या काही तासांतच रद्द करण्याची नामुष्की प्रशासनावर ओढवली आहे. भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी या निविदेत मोठ्या भ्रष्टाचाराचा संशय व्यक्त केल्यानंतर आयुक्त भूषण गगराणी यांनी तातडीने ही निविदा गुंडाळली आहे.

नेमकं प्रकरण काय?

गेल्या शुक्रवारी पालिकेच्या मध्यवर्ती खरेदी विभागाने मुंबईतील फूटपाथवर रेलिंग बसवण्यासाठी ३८५ कोटींची निविदा प्रसिद्ध केली होती. मात्र, आमदार अमित साटम यांनी यावर तीव्र आक्षेप घेतला. गेल्या दोन वर्षांत पालिकेने रेलिंग आणि 'स्ट्रीट फर्निचर'वर आधीच ३०० कोटी रुपये खर्च केले असताना, पुन्हा त्याच कामासाठी ३८५ कोटींची उधळपट्टी कशासाठी? असा सवाल साटम यांनी उपस्थित केला.
advertisement

मनोरंजन विश्वातील व्यक्तींचा हस्तक्षेप?

अमित साटम यांनी आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात एक खळबळजनक दावा केला आहे. "मनोरंजन क्षेत्रातील (Entertainment Business) काही व्यक्तींनी आता पालिकेत 'लायझनिंग'चा नवा व्यवसाय सुरू केला असून, त्यांच्या फायद्यासाठीच ही निविदा काढण्यात आली होती," असा आरोप त्यांनी केला आहे. तसेच, पालिकेला स्वतःच्या 'ई-वॉर्ड'चे ऑफिस बांधण्यासाठी पैसे नाहीत, पण ३८५ कोटींचे रेलिंग लावायला पैसे कुठून येतात? असा बोचरा सवालही त्यांनी केला.
advertisement

आयुक्तांची सारवासारव

या गदारोळानंतर पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी 'टाईम्स ऑफ इंडिया'शी बोलताना सांगितले की, "सध्या ही निविदा रद्द करण्यात आली आहे. अटी आणि शर्तींमध्ये बदल करून अधिक स्पर्धात्मक पद्धतीने ती पुन्हा काढली जाऊ शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पालिकेच्या २०२३ मधील स्ट्रीट फर्निचर निविदेचीही सध्या लोकायुक्तांमार्फत चौकशी सुरू आहे, ज्यामध्ये अनेक वस्तूंचे दर फुगवून लावल्याचे समोर आले होते. भाजप आणि शिवसेना (ठाकरे गट) यांनी अनेक वस्तूंच्या किमती वाढवल्याच्या तक्रारींनंतर बीएमसीने २०२३ मध्ये स्ट्रीट फर्निचर बसवण्यासाठी काढलेली २६३ कोटी रुपयांची शेवटची निविदाही वादात सापडली होती.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
BMC : मुंबई महापालिकेत ३८५ कोटींचा 'रेलिंग' घोटाळा? भाजपच्या एका पत्रानंतर निविदाच रद्द, प्रकरण काय?
Next Article
advertisement
Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement