'मातीत मिसळण्यापेक्षा तो कुणाच्या तरी कामी येईल'! 21 वर्षीय लेकाचा जेजुरीत मृत्यू, वडिलांचा 'तो' निर्णय ऐकून डॉक्टरांचेही डोळे पाणावले
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
संग्राम गाडे याचा ५ मार्च रोजी पुणे जिल्ह्यातील जेजुरी येथे भीषण अपघात झाला होता. सर्व प्रयत्न करून शेवटी डॉक्टरांनी संग्रामला 'ब्रेन डेड' घोषित केले.
पुणे : अकालीच तरुण मुलाला गमावण्याचं दुःख भयंकर असतं, पण याच दुःखाच्या डोंगरला बाजूला सारून एका पित्याने दाखवलेली माणुसकी संपूर्ण महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी ठरली आहे. बीडमधील राक्षसभुवन येथील 21 वर्षीय संग्राम रमेश गाडे या तरुणाचा पुण्यात अपघातात मृत्यू झाला. निधनानंतर त्याच्या वडिलांनी घेतलेल्या अवयवदानाच्या निर्णयामुळे पाच गरजू रुग्णांना आता नवसंजीवनी मिळणार आहे.
कशी घडली घटना?
संग्राम गाडे याचा ५ मार्च रोजी पुणे जिल्ह्यातील जेजुरी येथे भीषण अपघात झाला होता. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याला पुण्यातील सह्याद्री रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सर्व प्रयत्न करून शेवटी डॉक्टरांनी संग्रामला 'ब्रेन डेड' घोषित केले. गाडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला, पण अशा परिस्थितीतही त्यांनी डगमगून न जाता एक धाडसी निर्णय घेतला.
advertisement
पित्याचे हृदयस्पर्शी शब्द
जेव्हा डॉक्टरांनी पालकांकडे अवयवदानाविषयी विचारणा केली, तेव्हा वडील रमेश गाडे यांनी अश्रू पुसत दिलेलं उत्तर ऐकून उपस्थितांच्या अंगावरही काटा आला. ते म्हणाले, "माझ्या मुलाचे फक्त डोळेच नाही, तर त्याचे पूर्ण शरीरच दान करा. जे शरीर मातीत मिसळून जाणार आहे, ते जर कोणाला तरी नवी दृष्टी किंवा जीवन देऊ शकत असेल, तर त्यापेक्षा मोठं पुण्य काय?"
advertisement
गाडे कुटुंबाच्या या निर्णयामुळे पाच रुग्णांच्या जगण्याची आशा पल्लवित झाली आहे. ग्रामीण भागातील ही घटना अवयवदानाबाबतचे गैरसमज दूर करणारी आहे. "माझा मुलगा अवयवांच्या रूपात आता पाच जणांमध्ये जिवंत राहील," ही भावना व्यक्त करणारे हे कुटुंब खऱ्या अर्थाने माणुसकीचा नवा आदर्श ठरले आहे. या थोर निर्णयाचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Mar 09, 2026 11:47 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
'मातीत मिसळण्यापेक्षा तो कुणाच्या तरी कामी येईल'! 21 वर्षीय लेकाचा जेजुरीत मृत्यू, वडिलांचा 'तो' निर्णय ऐकून डॉक्टरांचेही डोळे पाणावले










