Pune News : 200 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अखेर यश मिळालं; पुण्यातील 'या' प्रसिद्ध भागाचे नाव बदलले

Last Updated:

Khadki Name Change : अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पुण्यातील ऐतिहासिक आणि प्रसिद्ध खडकी भागाचे नाव अखेर बदलण्यात आले आहे. ब्रिटिश काळापासून किरकी म्हणून ओळखले जाणारे हे क्षेत्र आता स्थानिकांच्या प्रयत्नांनी मूळ नावावर परतले नागरिकांमध्ये मोठा आनंद पाहायला मिळाला.

News18
News18
पुणे : ब्रिटिश राजवटीत खडकी या गावाचे नाव चुकीच्या स्वरूपात किरकी असे वापरण्यात येऊ लागले. स्वातंत्र्यानंतरही संरक्षण मंत्रालयाच्या कागदोपत्रीत हेच नाव कायम राहिले. मुळात मुळा नदीच्या काठावर वसलेले खडकी हे गाव असून ब्रिटिशांनी ऐतिहासिक दस्तऐवजांमध्ये किरकी असे नाव नोंदवले. देशाच्या स्वातंत्र्यानंतरही केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध कार्यालयांमध्ये तसेच प्रशासनिक कामकाजात किरकी नावाचा वापर सुरू होता. तथापि, रेल्वे, निवडणूक आयोग, टपाल सेवा आणि इतर काही सरकारी खात्यांमध्ये हळूहळू खडकी नाव परत वापरले जाऊ लागले.पण, संरक्षण विभागाच्या दस्तऐवजांमध्ये किरकी हा उल्लेख कायम होता.
खडकी कॅंटोन्मेंट बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी मराठी अधिकारी अमोल जगताप यांनी पदभार स्वीकारला. त्यांनी या गावाच्या खऱ्या नावाकडे लक्ष वेधले आणि 2017 मध्ये संरक्षण मंत्रालयाकडे पत्र पाठवून स्पष्ट केले की कागदोपत्रीत किरकी ऐवजी खडकी हे नाव वापरणे आवश्यक आहे. जगताप यांच्या प्रयत्नांमुळे खडकीच्या नावाशी संबंधित प्रशासनिक दस्तऐवजांत सुधारणा करण्याचा मार्ग सुरू झाला.
advertisement
यानंतर अमोल जगताप यांची नियुक्ती लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाच्या रक्षा संपदा विभागाच्या संचालकपदी झाली. त्यांनी या आधी पाठवलेल्या पत्राची आठवण करून संरक्षण मंत्रालयाकडून योग्य ती कारवाई करण्याचे विनंती केले. मंत्रालयाने या बाबतीत गंभीर विचार करून किरकीऐवजी खडकी या नावाचा अधिकारिक वापर करण्याचा निर्णय घेतला. 29 ऑगस्ट रोजी अधिसूचना जारी करून हा निर्णय अंमलात आणला गेला.
advertisement
या निर्णयामुळे 200 वर्षांपूर्वीच्या ऐतिहासिक नावावर पुनर्स्थापन झाले आणि खडकी गावाचे खरे नाव पुन्हा प्रशासनिक दस्तऐवजांमध्ये वापरण्याचा मार्ग मोकळा झाला. आता रेल्वे, निवडणूक आयोग, टपाल सेवा, संरक्षण मंत्रालय तसेच इतर सरकारी संस्था खडकी या नावाचा वापर करतील. हे पाऊल स्थानिक प्रशासनासाठी आणि गावकऱ्यांसाठी महत्त्वाचे ठरले आहे, कारण ऐतिहासिक नावाची जाणीव व त्याचा योग्य वापर यामुळे गावाच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक ओळखीला बळकटी मिळाली आहे. अमोल जगताप यांच्या दूरदृष्टीने आणि प्रयत्नांमुळे, खडकी गावाचे खरे नाव अधिकृतपणे पुनर्स्थापित झाले असून, भविष्यातील कागदोपत्री आणि प्रशासनिक कामकाजात हे नाव कायम राहणार आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune News : 200 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अखेर यश मिळालं; पुण्यातील 'या' प्रसिद्ध भागाचे नाव बदलले
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement