advertisement

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील पहिला आरोपी येणार बाहेर, बीड कोर्टाने दिली स्पेशल परवानगी

Last Updated:

वाल्मिक कराडच्या मुलाने पत्रकार परिषद घ्यावी म्हणजे हे प्रकरण कुणामुळे घडलं कुणाचं एवढं पाठबळ होतं, म्हणजे सर्व बाहेर येईल.

News18
News18
बीड :  अवघ्या महाराष्ट्राला हादरवणाऱ्या सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणाची सुनावणी जिल्हा व विशेष न्यायालयात पार पडली. या प्रकरणाची पुढील तारीख 24 मार्च निश्चित करण्यात आली आहे. हत्या प्रकरणातील आरोपी जयराम चाटेकडून कोर्टाकडे अर्ज दाखल करण्यात आली आहे. भावाच्या मृत्यूनंतर धार्मिक विधीसाठी जाण्यास परवानगी द्यावी, म्हणून न्यायालयात विनंती अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर धनंजय देशमुख यांनी तीव्र आक्षेप नोंदवत प्रशासनासमोर सवाल उपस्थित केला आहे. आरोपीला अशा प्रकारे बाहेर सोडल्यास परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्याला जबाबदार कोण? असा सवाल देशमुख यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, आज सुनावणी दरम्यान जयराम चाटेकडून कोर्टाकडे अर्ज दाखल करण्यात आली आहे. भावाच्या मृत्यूनंतर धार्मिक विधीसाठी जाण्यास परवानगी द्यावी, 13 तारखेला हा धार्मिक विधी आहे. या साठी दाखल अर्जावर सरकारी पक्षाकडून जाण्यास परवानगी देण्यात आली आहे. तर सुप्रीम कोर्टाची वाल्मीक कराडच्या जामीन अर्जावरील ऑर्डर कोर्टामध्ये सादर करण्यात आली आहे.

धनंजय देशमुख  नेमकं म्हणाल्या?

advertisement
जयराम चाटेच्या अर्जावर धनंजय देशमुख म्हणाले, आरोपीचे नातेवाईक जे कोणी वारले त्याबद्दल न्यायालयात अर्ज आला आहे. त्यावरत वकील उज्वल निकम सांगितलं. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो त्यामुळे याची सर्व जबाबदारी पोलीस प्रशासनाने घ्यावी आणि त्यावरती न्यायालयाने त्याची ऑर्डर द्यावी. हे प्रकरण खूप सेन्सिटिव्ह असून ही केस महाराष्ट्राची आहे. सव्वा वर्षापासून महाराष्ट्र बघतोय की हे आरोपी किती खालच्या पातळीचे आहेत. जर यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर याला जबाबदार कोण? या सगळ्या गोष्टीवर जे काय आहे ते न्यायालय निर्णय देईल.
advertisement

वाल्मिक कराडच्या लेकाच्या पोस्टवर धनंजय देशमुख काय म्हणाले? 

वाल्मिक कराडच्या लेकाच्या पोस्टवर धनंजय देशमुख म्हणाले, त्याच्या पहिल्या पोस्टवरच मी बोललो होतो. त्यानंतर मी त्यावर बोललो नाही आणि बोलणार देखील नाही. त्याला पूर्ण बोलण्याचा अधिकार आहे, म्हणूनच मी म्हणत होतो की त्यांनी एक पत्रकार परिषद घ्यावी. हे प्रकरण कुणामुळे घडलं कुणाचं एवढं पाठबळ होतं, म्हणजे सर्व बाहेर येईल.   हे मला सर्व माहीत होतं म्हणूनच मी असं बोललो होतो. यामागे गणित असू शकतं काही गोष्टी आणखीन पेपरावर आल्या नाहीत कोर्टात आल्या नाहीत, मात्र त्या अस्तित्वात आहेत. आम्ही वेळोवेळी यावर व्यक्त देखील होतो त्याचे पुरावे देखील देतो.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील पहिला आरोपी येणार बाहेर, बीड कोर्टाने दिली स्पेशल परवानगी
Next Article
advertisement
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार, कोणालाच माहिती नाही भारताचा 'बॅकअप प्लॅन'
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार
  • पेट्रोल-डिझेलच्या साठ्याबाबत मोठी अपडेट

  • जाणून घ्या किती दिवस पुरेल तेलसाठा

  • भारताचे 'ऑईल सिक्रेट' पहिल्यांदाच कळाले

View All
advertisement