advertisement

5 हजार रुपयांचा शेअर 22 रुपयांवर; एका चुकीने 24,000 कोटींची कंपनी कंगाल झाली, आता मार्केटमधून आली मोठी अपडेट

Last Updated:

Share Market: कधीकाळी ऑफशोर ड्रिलिंग ही भारतातील सर्वात मोठ्या ऑफशोर ड्रिलिंग कंपन्यांपैकी एक मानली जात होती. मात्र प्रचंड कर्ज, रिग अपघात आणि तेलाच्या किमतीतील घसरणीमुळे कंपनी आज दिवाळखोरी प्रक्रियेत पोहोचली आहे.

News18
News18
कधीकाळी सुमारे 24,000 कोटींच्या मूल्यासह भारतातील सर्वात मोठ्या ऑफशोर ड्रिलिंग कंपन्यांपैकी एक मानली जाणारी Aban Offshore आज दिवाळखोरी प्रक्रियेत पोहोचली आहे. एकेकाळी या कंपनीचा शेअर सुमारे 5,000 च्या आसपास व्यवहार करत होता, मात्र अनेक मोठ्या धक्क्यांमुळे कंपनीची संपूर्ण कहाणी बदलली. रिग अपघात, प्रचंड कर्ज, कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली घसरण आणि कोविड संकटामुळे कंपनी हळूहळू कमकुवत होत गेली. आता हा वाद National Company Law Tribunal (NCLT) आणि National Company Law Appellate Tribunal (NCLAT) पर्यंत पोहोचला असून, आता कर्जदाते कंपनीच्या भवितव्याचा निर्णय घेणार आहेत.
घसरणीची सुरुवात कशी झाली?
ही कथा आहे भारतातील ऑफशोर ड्रिलिंग क्षेत्रातील मोठी कंपनी Aban Offshore ची. कधीकाळी ही कंपनी भारतातील सर्वात मोठ्या ऑफशोर ड्रिलिंग कंपन्यांपैकी एक होती. 2007–08 या काळात कंपनीचे बाजारमूल्य सुमारे 24,000 कोटी होते आणि शेअर बाजारात तिचे वर्चस्व स्पष्ट दिसत होते.
मात्र याच काळात कंपनीने एक मोठा निर्णय घेतला. तिने नॉर्वेतील Sinvest ही कंपनी सुमारे 10,400 कोटींना विकत घेतली. या व्यवहारासाठी कंपनीने 6,400 कोटींहून अधिक कर्ज घेतले. त्या वेळी हा निर्णय कंपनीच्या विस्ताराच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला गेला, परंतु पुढे हेच मोठे कर्ज कंपनीसाठी सर्वात मोठे संकट ठरले.
advertisement
2010 मधील अपघाताने बदलली दिशा
2010 मध्ये कंपनीला असा मोठा धक्का बसला की त्यातून ती पूर्णपणे सावरू शकली नाही. कंपनीचा Aban Pearl हा रिग व्हेनेझुएलामध्ये बुडाला. या घटनेमागे ऑपरेशनल आणि सुरक्षा त्रुटी कारणीभूत असल्याचे मानले गेले.
या अपघातामुळे कंपनीला 800 ते 900 कोटींच्या महसुलाचे नुकसान झाले. याशिवाय कंपनीचा मोठा ग्राहक असलेली PDVSA ही कंपनीही हातातून गेली. या घटनेनंतर गुंतवणूकदारांचा विश्वास कमी झाला आणि कंपनीचा शेअर सुमारे 35% पर्यंत घसरला.
advertisement
कच्च्या तेलाच्या किमतीतील घसरणीने वाढवला संकट
यानंतर 2014 ते 2016 दरम्यान कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये मोठी घसरण झाली. तेलाची किंमत $100 प्रति बॅरलवरून सुमारे $35 प्रति बॅरलपर्यंत घसरली, म्हणजेच जवळपास 65% घसरण झाली.
याचा थेट परिणाम ऑफशोर ड्रिलिंग कंपन्यांवर झाला.
त्याचा परिणाम डे-रेट्समध्ये मोठी घट झाली, नवीन कॉन्ट्रॅक्ट मिळणे थांबले, ऑर्डरबुक कमकुवत झाली, महसूल झपाट्याने कमी झाला. आधीच मोठ्या कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या Aban Offshore साठी हा धक्का खूपच मोठा ठरला.
advertisement
कोविडमुळे व्यवसाय जवळपास संपला
2020 मध्ये कोविडमुळे कंपनीची परिस्थिती आणखी बिकट झाली. ऑफशोर ड्रिलिंगचे काम जवळपास थांबले. कंपनीकडे काम नव्हते, उत्पन्न नव्हते, मात्र कर्ज सतत वाढतच होते. त्यामुळे कर्ज फेडणे जवळपास अशक्य झाले.
2025 पर्यंत परिस्थिती अत्यंत गंभीर
2025 पर्यंत कंपनीवर एकूण 14,880 कोटींचे कर्ज झाले. कंपनीची नेट वर्थ निगेटिव्ह झाली आणि ऑडिटर्सनीही कंपनीच्या going concern वर प्रश्न उपस्थित केले.
advertisement
कर्ज कमी करण्यासाठी कंपनीने काही उपाय करण्याचा प्रयत्न केला. ज्यात 121 कोटींचा सेटलमेंट प्रस्ताव, 7 रिग विकण्याचा प्रयत्न. मात्र यापैकी कोणताही प्रयत्न यशस्वी ठरला नाही.
शेअरहोल्डिंगची स्थिती
डिसेंबर 2025 पर्यंत उपलब्ध आकडेवारीनुसार
प्रमोटर्सची हिस्सेदारी: 46%
त्यापैकी 19.37% शेअर्स गहाण
पब्लिक शेअरहोल्डिंग: 47.28%
FII आणि DII ची हिस्सेदारी जवळपास नगण्य
आता प्रकरण NCLT आणि NCLAT मध्ये
कंपनी सध्या अधिकृतपणे IBC (Insolvency and Bankruptcy Code) प्रक्रियेत आहे आणि तिचे प्रकरण NCLT मध्ये दिवाळखोरी प्रक्रियेत चालू आहे. दरम्यान NCLAT च्या चेन्नई खंडपीठाने या प्रकरणाची सुनावणी 27 मार्च 2026 पर्यंत पुढे ढकलली आहे. ही अपील कंपनीचे निलंबित व्यवस्थापकीय संचालक Reji Abraham यांनी दाखल केली असून ती Punjab National Bank विरोधात आहे.
advertisement
सुनावणीदरम्यान अपीलकर्त्यांच्या वतीने सांगण्यात आले की बँकेसोबत समझोता करण्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि त्यासाठी वेळ हवा आहे. जरी PNB ने याला विरोध केला असला तरी न्यायालयाने न्यायाच्या हितासाठी पुढील तारीख दिली. जर ठराविक वेळेत समझोता झाला तर प्रकरण निकाली निघू शकते. अन्यथा ट्रिब्युनल या प्रकरणाची सुनावणी गुणवत्तेच्या आधारे पुढे सुरू ठेवेल.
advertisement
शेअरमध्ये अलीकडील हालचाल
दरम्यान 6 मार्च 2026 रोजी कंपनीच्या शेअरमध्ये तेजी दिसून आली.
मागील बंद भाव: 21.24
ओपनिंग: 22.10
अपर सर्किट: 22.30
फक्त एका आठवड्यात कंपनीचा शेअर सुमारे 15% वाढला आहे.
view comments
मराठी बातम्या/मनी/
5 हजार रुपयांचा शेअर 22 रुपयांवर; एका चुकीने 24,000 कोटींची कंपनी कंगाल झाली, आता मार्केटमधून आली मोठी अपडेट
Next Article
advertisement
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार, कोणालाच माहिती नाही भारताचा 'बॅकअप प्लॅन'
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार
  • पेट्रोल-डिझेलच्या साठ्याबाबत मोठी अपडेट

  • जाणून घ्या किती दिवस पुरेल तेलसाठा

  • भारताचे 'ऑईल सिक्रेट' पहिल्यांदाच कळाले

View All
advertisement