advertisement

Vaibhav Sooryavanshi VIDEO : बोर्डाची परीक्षा बुडवली, पण वैभव सूर्यवंशी मैदानात पास, 305 च्या स्ट्राईक रेटने धुतलं, वादळी खेळी

Last Updated:

वैभव सूर्यवंशीने आजच्या सामन्यात 305 च्या स्ट्राईकने धावा केल्या होत्या. या दरम्यान त्याने धावांचा पाऊस पाडला होता. या खेळीचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.

vaibhav sooryavanshi
vaibhav sooryavanshi
Vaibhav Sooryavanshi VIDEO : टीम इंडियाचा 14 वर्षीय स्टार खेळाडू वैभव सूर्यवंशी यंदाच्या वर्षी दहावीच्या सीबीएससी बोर्डाचा परीक्षा देणार होता. पण त्याने परीक्षा बुडवून मैदानात उतरणे पसंत केले होते. आणि हा त्याचा निर्णय किती योग्य होता हे त्याने आजच्या त्याच्या खेळीतून स्पष्ट केले आहे. वैभव सूर्यवंशीने आजच्या सामन्यात 305 च्या स्ट्राईकने धावा केल्या होत्या. या दरम्यान त्याने धावांचा पाऊस पाडला होता. या खेळीचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. तसेच वैभवच्या या खेळीने तो बोर्डाची परीक्षा बुडवून मैदानात पास झाल्याचे सांगितले.
वैभव सू्र्यवंशी बोर्डाची परीक्षा बुडवून आयपीएल 2026 प्रॅक्टीससाठी राजस्थान रॉयल्सच्या कॅम्पमध्ये पोहोचला होता. नागपूरमध्ये यावेळी त्यांचे प्रॅक्टीस सेशन पार पडलं होतं. या प्रॅक्टीस सेशननंतर तो डीवाय पाटील टी20 लीगमध्ये सामील झाला होता. आता या लीगमध्ये तो धावांचा पाऊस पाडतो आहे.



 










View this post on Instagram























 

A post shared by Rajasthan Royals (@rajasthanroyals)



advertisement
खरं तर डीवाय पाटील टी20 लीगमध्ये इनकम ट्रॅक्सच्या टीमने प्रथम फलंदाजी करताना 211 धावा केल्या होत्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना डिवाय पाटील ब्लू संघाकडून वैभव सूर्यवंशीने वादळी खेळी केली होती. वैभव सूर्यवंशीने यावेळी 19 बॉलमध्ये 58 धावांची धुवाधार खेळी केली होती. या खेळी दरम्यान त्याने 4 चौकार आणि 6 षटकार मारले होते. वैभव सुर्यवंशीने यावेळी गोलंदाजी करताना शाहबाज अहमद आणि पार्थ रेखाडे यांना फोडून काढलं होतं.
advertisement
वैभव बाद झाल्यानंतर मॅच फसेल असे वाटत होते. पण कॅप्टन शशांक सिंहने डाव सावरत 32 बॉलमध्ये 53 धावांची खेळी करून 4 विकेटने सामना जिंकला होता. या विजयाने कॅप्टन राहुल तेवतियाच्या 83 धावांच्या झुंजार खेळीवर पाणी फिरले होते.
बोर्डाची परीक्षा का बुडवली?
सीबीएससीच्या दहावीच्या बोर्डाच्या परिक्षेला 17 फेब्रुवारी 2026 पासून सूरूवात झाली होती. आणि ही परीक्षा 11 मार्च 2026 पर्यंत असणार आहे. या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी वैभव सूर्यवशी परिक्षेला हजर नव्हता.वैभवने त्याच्या बोर्डाच्या परिक्षेचा फॉर्म सबमीट केला होता आणि त्याचं हॉलतिकीट देखील त्याला देण्यात आलं होतं. पण तो परीक्षा केंद्रावर आलाच नाही. त्यामुळे आम्ही सीबीएससीच्या नियमानुसार त्याला गैरहजर मार्क केले आहे, असे पोदार इंटरनेशनल स्कुलचे प्रिंसिपल एनके सिन्हा यांनी सांगितले आहे.
advertisement
वैभल सूर्यवंशीच्या वडिलांनी सोडलं मौन
दरम्यान या सगळ्या घडामोडीनंतर आता वैभव सूर्यवंशींच्या वडिलांनी यावर मौन सोडलं आहे.वैभव सू्र्यवंशीने जर बोर्डाची परीक्षा दिली तर त्याला क्रिकेटवर लक्ष केंद्रीत करता येणार नाही आहे.आणि माझा मुलगा खूप हुशार आहे पण त्याचं संपूर्ण लक्ष आता क्रिकेटकडे आहे असे देखील संजीव सूर्यवंशी यांनी सांगितले.
वैभव अभ्यासात हुशार आहे त्याला प्रत्येक विषयात 90 टक्के मिळतात, पण सध्या क्रिकेट गरजेच आहे,असे संजीव सूर्यवंशी सांगतात. त्यामुळे एकंदरीत त्याने आयपीएलसाठी आपली बोर्डाची परीक्षा सोडली आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Vaibhav Sooryavanshi VIDEO : बोर्डाची परीक्षा बुडवली, पण वैभव सूर्यवंशी मैदानात पास, 305 च्या स्ट्राईक रेटने धुतलं, वादळी खेळी
Next Article
advertisement
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार, कोणालाच माहिती नाही भारताचा 'बॅकअप प्लॅन'
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार
  • पेट्रोल-डिझेलच्या साठ्याबाबत मोठी अपडेट

  • जाणून घ्या किती दिवस पुरेल तेलसाठा

  • भारताचे 'ऑईल सिक्रेट' पहिल्यांदाच कळाले

View All
advertisement