मुंबईत आकडे फिरले,काँग्रेस किंगमेकरच्या भूमिकेत; कोण आहेत 20 धुरंदर ज्यांनी गेम पलटवला
- Published by:Prachi Amale
Last Updated:
मुंबईत आकडे फिरल्यास काँग्रेस किंगमेकरच्या भूमिकेत येण्याची शक्यता आहे.
मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या निकालात मोठा ट्वीस्ट समोर आला आहे. मुंबई महापालिका निवडणुकीचे कल अद्यापही स्पष्ट झाले नसल्याचे चित्र आहे. दुपारपर्यंत बहुमताचा कल गाठणाऱ्या महायुतीचा आकडा संध्याकाळपर्यंत कमी झाला. आकडे फिरल्यास काँग्रेस किंगमेकरच्या भूमिकेत येण्याची शक्यता आहे. इतर पक्ष एकत्र आल्यास सत्तेचे समीकरण बदलू शकते का, याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
मुंबईत सत्ता स्थापन करण्यासाठी 114 चा जादूई आकडा आहे. मुंबई महानगरपालिकेच्या हाती आलेल्या आकड्यानुसार सध्या भाजप आणि शिंदेंच्या युतीला 110 जागा मिळाल्या असून ठाकरे बंधू 72 जागांवर आहे. तर काँग्रेस 23 जागांवर असून इतर जागांवर 10 नगरसेवक आहे.या इतरमध्ये एमआयएमचे 8 नगरसेवक आहेत. यामुळे मुंबईत चित्र बदलण्याची शक्यता आहे.
| विधानसभा क्षेत्र (AC) | विजयी पक्ष | वॉर्ड क्र. | नगरसेवकाचे नाव (INC) |
| कांदिवली (पूर्व) | INC | 28 | डॉ. अजंता यादव |
| मालाड पश्चिम | INC | 33 | कमरजहाँ मोहंमद मोईन सिद्दीकी |
| मालाड पश्चिम | INC | 34 | हैदर अस्लम शेख |
| मालाड पश्चिम | INC | 48 | रफिक इलियास शेख |
| मालाड पश्चिम | INC | 49 | संगीता कोळी |
| वर्सोवा | INC | 61 | दिव्या अवनीश सिंग |
| अंधेरी पश्चिम | INC | 66 | मेहेर मोहसीन हैदर |
| कलिना | INC | 90 | ॲड. ट्युलिप मिरांडा |
| वांद्रे पूर्व | INC | 92 | मोहंमद इब्राहिम मोहंमद इक्बाल कुरेशी |
| चेंबूर | INC | 150 | वैशाली अजित शेडकर |
| कलिना | INC | 165 | मोहंमद अशरफ आझमी |
| कलिना | INC | 167 | डॉ. समन अर्शद आझमी |
| शीव (सायन) | INC | 179 | आयशा सुफियान वानू |
| धारावी | INC | 183 | आशा दीपक काळे |
| धारावी | INC | 184 | साजिदा बी बब्बू खान |
| भायखळा | INC | 211 | खान मोहंमद वकूर नासिर अहमद |
| मुंबादेवी | INC | 213 | नसीमा जावेद जुनेजा |
| मुंबादेवी | INC | 216 | राजश्री महेश भाटणकर |
| मुंबादेवी | INC | 223 | ज्ञानराज यशवंत निकम |
advertisement
मुंबई महानगरपालिकेच्या मतमोजणीत संध्याकाळपर्यंत चित्र पूर्णपणे बदलताना दिसत आहे. सकाळच्या सत्रात एकतर्फी वाटणारी ही लढत आता थेट अटीतटीमध्ये रूपांतरित झाली आहे. महायुतीने (भाजप–शिंदे गट) बहुमताचा आकडा गाठल्याचा दावा केला असला, तरी अनेक महत्त्वाच्या वॉर्डांमध्ये ठाकरे गट आणि मनसेने दिलेल्या कडव्या झुंजीमुळे महायुतीच्या गोटात धाकधूक वाढली आहे. दुपारी भाजपकडून विजयाच्या जल्लोषासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला, मात्र मुंबई महापालिकेच्या विजयावर आक्रमक दावा करण्याऐवजी सावध भूमिका घेतल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले. त्यामुळे राज्यासह संपूर्ण देशाचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे.
advertisement
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 16, 2026 8:00 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
मुंबईत आकडे फिरले,काँग्रेस किंगमेकरच्या भूमिकेत; कोण आहेत 20 धुरंदर ज्यांनी गेम पलटवला










