BMC Election Results : मुंबईच्या निकालात मोठा ट्विस्ट, आकडे फिरले, महायुती ११० जागांच्या खाली, ठाकरेंकडून कडवी झुंज
- Written by:Shrikant Bhosale
Last Updated:
BMC Election Results: मुंबई महापालिका निवडणुकीचे कल अद्यापही स्पष्ट झाले नसल्याचे चित्र आहे. दुपारपर्यंत बहुमताचा कल गाठणाऱ्या महायुतीचा आकडा संध्याकाळपर्यंत कमी झाला.
मुंबई: मुंबई महापालिका निवडणुकीचे कल अद्यापही स्पष्ट झाले नसल्याचे चित्र आहे. दुपारपर्यंत बहुमताचा कल गाठणाऱ्या महायुतीचा आकडा संध्याकाळपर्यंत कमी झाला. मुंबई महापालिकेची मतमोजणी २३ केंद्रावर सुरु असून एकाच वेळी फक्त २ वॉर्डची मतमोजणी होत आहे. मुंबईचे चित्र अद्यापही स्पष्ट झाले नसल्याने राजकीय पक्षांनी प्रतिक्रिया देणे टाळले असल्याचे म्हटले जात आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या मतमोजणीत संध्याकाळ होताच अत्यंत नाट्यमय घडामोडी पाहायला मिळत आहेत. सकाळच्या सत्रात एकतर्फी वाटणारी निवडणूक आता 'काँटे की टक्कर' मध्ये रूपांतरित झाली आहे. महायुतीने (भाजप-शिंदे गट) बहुमताचा आकडा गाठल्याचा दावा केला असला तरी, अनेक वॉर्डांमध्ये ठाकरे गट आणि मनसेने निकराची झुंज देत महायुतीची धाकधूक वाढवली आहे. भाजपने दुपारी विजयाच्या जल्लोषासाठी कार्यक्रम केला. मात्र, यावेळी मुंबई महापालिकेच्या विजयावर आक्रमकपणे भाष्य करणं टाळलं असल्याचे दिसून आले.
advertisement
>> मुंबई महापालिका निवडणूक - पक्ष निहाय माहिती कल/निकाल
> भाजपा ८२
> शिवसेना ठाकरे ६३
> शिंदे २६
> काँग्रेस २२
> एमआयएम ८
> समाजवादी पार्टी २
> मनसे ७
> राष्ट्रवादी २
> राष्ट्रवादी शरद पवार १
>> गिरणगावात 'ठाकरे' फॅक्टर जोरात!
मुंबईत भाजप महायुतीने मुसंडी मारली असली, तरी गिरणगावातील मतदारांनी मात्र ठाकरेंनाच पसंती दिली आहे. शिवडी आणि लालबाग विधानसभा क्षेत्रातील ६ महत्त्वाच्या वॉर्डपैकी ५ वॉर्डमध्ये ठाकरे बंधूंनी (शिवसेना UBT आणि मनसे) विजय मिळवत विरोधकांना धोबीपछाड दिली आहे.
advertisement
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 16, 2026 7:44 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
BMC Election Results : मुंबईच्या निकालात मोठा ट्विस्ट, आकडे फिरले, महायुती ११० जागांच्या खाली, ठाकरेंकडून कडवी झुंज









