BMC Elections : खेळ अजून संपला नाही! मुंबई पालिकेच्या निकाल फिरला, ठाकरे करू शकता का कमबॅक?
- Published by:Sachin S
Last Updated:
भाजपला बहुमताने हुलकावणी दिली आहे. त्यामुळे आता काँग्रेस किंगमेकरच्या भूमिकेत आली आहे.
मुंबई : संपूर्ण देशाचं लक्ष लागून असलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीचा निकाल अजूनही स्पष्ट झाला नाही. अजूनही मतमोजणी सुरू आहे. दिवसभरात भाजपने जोरदार आघाडी घेतली होती.. भाजपने बहुमताचा आकडा गाठला असं सांगितलं जात होतं. पण, संध्याकाळी निकालामध्ये मोठा बदल झाला आहे. भाजपला बहुमताने हुलकावणी दिली आहे. त्यामुळे आता काँग्रेस किंगमेकरच्या भूमिकेत आली आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मतमोजणी उशिराने सुरू आहे. त्यामुळे विजयी जल्लोष सुरू करणाऱ्या कार्यकर्त्यांनी आता आवरतं घ्यावं लागलं आहे, भाजप आणि शिवसेना युतीकडे १२१ जागांची आघाडी होती. पण, संध्याकाळी निकाल फिरला आणि महायुतीची आकडेवारी ही १०५ वर आली आहे. त्यामुळे बहुमताचा आकडा गाठण्यासाठी ११४ जागा लागणार आहे. भाजप सध्याा ८२ जागा, शिवसेना २६ जागेवर विजयी आहे.
advertisement
तर दुसरीकडे ठाकरे बंधूंच्या शिवशक्तीकडे ७० जागांवर विजयी आघाडी आहे. ठाकरे गटाकडे ६३ आणि मनसे ७ जागांवर विजयी आहे. आणखी २५ ते ३० मतदारसंघाची मतमोजणी सुरू आहे. ठाकरे बंधूंना अजूनही चमत्काराची अपेक्षा आहे.
काँग्रेस ठरणार किंगमेकर
तर तिसऱ्या स्थानावर असलेल्या काँग्रेस २२ जागांवर विजयी आहे. अजूनही काही ठिकाणी मतमोजणी सुरू आहे. तर राष्ट्रवादी २ जागा आणि इतर हे १० जागांवर विजयी झाले आहे. त्यामुळे आता महायुतीला बहुमताासाठी काँग्रेस आणि इतरांची गरज लागणार आहे, हे आता स्पष्ट आहे. पण, काँग्रेस महायुतीला पाठिंबा देईल अशी शक्यता धुसर आहे. त्यामुळे महायुतीला अपक्षांची मोट बांधावी लागणार आहे.
advertisement
जर महायुतीला बहुमताचा आकडा गाठता आला नाहीतर दुसऱ्या मोठ्या पक्षाला संधी मिळणार आहे. जर ठाकरे आणि विरोधकांचा विचार केला तरी बहुमताचा आकडा सहज गाठता येणार नाही. कारण, ठाकरे बंधू आणि विरोधकांची जागेची बेरिज जरी केली तरी १०५ च्या आतच आहे. त्यामुळे अंतिम निकालानंतर चित्र बदलणार आहे.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 16, 2026 7:57 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
BMC Elections : खेळ अजून संपला नाही! मुंबई पालिकेच्या निकाल फिरला, ठाकरे करू शकता का कमबॅक?










