आजचा सोन्याचा दर 112653! नवरात्रीपर्यंत किती वाढणार? खरेदीची योग्य वेळ की थांबावं?
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
मुंबईत सोन्याचे दर 1 लाख 12 हजार रुपयांवर पोहोचले. MCX, IBJA, रिलायन्स सिक्युरिटीज, एस्पेक्ट बुलियन अँड रिफायनरी यांच्या मते वाढ कायम राहू शकते.
मुंबई सोन्याचा दर: सोन्या चांदीने विक्रमी नोंद केली आहे. मागच्या 20 वर्षातील सगळे रेकॉर्ड मोडीत काढून सोन्याचे दर 1 लाख 12 हजार रुपयांवर प्रति तोळा पोहोचले आहेत. आज सोन्याच्या दराने भारतात नवा इतिहास रचला. देशात प्रथमच सोन्याचा भाव 1 लाख 12 हजारक रुपये प्रति 10 ग्रॅमव गेला. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय दोन्ही बाजारात सोन्याचे दर आतापर्यंतच्या सर्वात उच्चांकी पातळीवर पोहोचले आहेत. अमेरिकेतील व्याजदरांमध्ये कपातीची शक्यता आणि डॉलरचे कमकुवत होणे ही या वाढीमागील प्रमुख कारणे मानली जात आहेत.
मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर डिसेंबर डिलिव्हरीसाठीचे गोल्ड फ्यूचर्स 458 ने वाढून 1 लाख 12 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमच्या विक्रमी स्तरावर पोहोचले. ऑक्टोबर कॉन्ट्रॅक्टमध्येही 482 ची वाढ होऊन तो 1,09,000 प्रति 10 ग्रॅम वर पोहोचला. अमेरिकेकडून आलेल्या कमकुवत रोजगार अहवालामुळे बाजारात अशी अपेक्षा वाढली आहे की, अमेरिकेची सेंट्रल बँक, फेडरल रिझर्व्ह या वर्षाच्या अखेरीस व्याजदरांमध्ये तीन वेळा कपात करू शकते.
advertisement
पुढील आठवड्यात होणाऱ्या धोरणात्मक बैठकीतही 0.25% ची कपात होण्याची शक्यता आहे. व्याजदर कमी झाल्याने गुंतवणूकदार शेअर बाजार किंवा बाँड्सऐवजी सोन्यासारख्या सुरक्षित पर्यायांमध्ये पैसे गुंतवत आहेत. बँका देखील मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी करत आहेत. रिलायन्स सिक्युरिटीजचे जिगर त्रिवेदी यांनी सांगितले की, "अमेरिकेतील कमकुवत रोजगाराची आकडेवारी आणि व्याजदरांमधील संभाव्य कपातीमुळे सोने विक्रमी उंचीवर पोहोचले आहे."
advertisement
एस्पेक्ट बुलियन अँड रिफायनरीचे सीईओ दर्शन देसाई यांच्या मते, ही तेजी पुढेही कायम राहू शकते, पण त्याची स्थिरता आगामी रोजगार आणि महागाईच्या आकडेवारीवर अवलंबून असेल. त्यामुळे सोन्याचे दागिने करण्यापेक्षा 24 कॅरेटमध्ये गुंतवणूक करणं आता फायद्याचं ठरेल. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) चे उपाध्यक्ष अक्षय कांबोज यांनी सांगितले की, "जागतिक अनिश्चितता आणि गुंतवणूकदारांचा सोन्यावरील विश्वास यामुळे सोन्याचे आकर्षण वाढत आहे."
advertisement
आता सोनं कमी होण्याचे कोणतेही चान्स नाहीत याउलट नवरात्र, दिवाळी आणि लग्न सोहळ्यामुळे सोन्या चांदीचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. 5000 डॉलरवर सोनं पोहोचण्याची शक्यता आहे. 1 लाख 25 हजारवर भारतात सोनं पोहोचण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याच स्पीडने दरवाढ राहिली तर वर्षाच्या अखेरीस नवीन विक्रम नोंदवला जाऊ शकतो.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 09, 2025 2:29 PM IST
मराठी बातम्या/मनी/
आजचा सोन्याचा दर 112653! नवरात्रीपर्यंत किती वाढणार? खरेदीची योग्य वेळ की थांबावं?