TRENDING:

मुख्यमंत्र्यांची घोषणा! नमो शेतकरीचे पैसे खात्यात जमा, तुम्हाला पैसे मिळाले का? 2 मिनिटांत चेक करा

Last Updated:

Namo Shetkari Yojana : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. राज्य सरकारच्या ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेचा सातवा हप्ता आज मंगळवारी जमा केला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई :  शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. राज्य सरकारच्या ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेचा सातवा हप्ता आज मंगळवारी जमा केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा हप्ता ऑनलाईन पद्धतीने थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला आहे.
Namo Shetakri Yojana
Namo Shetakri Yojana
advertisement

किती शेतकऱ्यांना मिळणार फायदा?

या हप्त्याचा लाभ राज्यातील तब्बल ९२ लाख ९१ हजार शेतकऱ्यांना होणार आहे. प्रत्येक शेतकऱ्याच्या बँक खात्यात २ हजार रुपये जमा केले जाणार असून यासाठी राज्य सरकारकडून तब्बल १ हजार ९३२ कोटी ७२ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

केंद्र आणि राज्य सरकारची दुहेरी मदत

शेतकऱ्यांना आर्थिक बळ देण्यासाठी केंद्र सरकारतर्फे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-Kisan) योजनेअंतर्गत दरवर्षी ६ हजार रुपये दिले जातात. त्यात राज्य सरकारने आणखी ६ हजार रुपयांची भर घालत ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजना सुरू केली आहे. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना एकूण १२ हजार रुपयांचा थेट आर्थिक फायदा मिळतो.

advertisement

केंद्र सरकारने पीएम किसान योजनेचा २० वा हप्ता २ ऑगस्ट रोजी वितरित केला होता. त्यानंतर राज्य सरकारकडून हा सातवा हप्ता दिला जात आहे. याआधीचे सहा हप्ते देखील शेतकऱ्यांच्या खात्यात यशस्वीरीत्या जमा झालेले आहेत.

हप्ता मिळाला का? तपासायची सोपी पद्धत

शेतकऱ्यांना आपला हप्ता जमा झाला आहे की नाही हे घरबसल्या ऑनलाईन तपासण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी शेतकऱ्यांनी NSMNY या अधिकृत संकेतस्थळावर जावे.

advertisement

तपासणीसाठी संकेतस्थळावर Beneficiary Status हा पर्याय निवडावा लागतो. लॉगिन करण्यासाठी तीन पर्याय उपलब्ध आहेत.नोंदणी क्रमांक, आधार क्रमांक, आधारशी संलग्न मोबाईल क्रमांक

योग्य पर्याय निवडून संबंधित क्रमांक टाकावा, दिलेला कॅप्चा भरावा आणि Get Aadhaar OTP वर क्लिक करावे. नोंदणीकृत मोबाईलवर आलेला ओटीपी भरल्यानंतर शेतकऱ्यांचा Beneficiary Status स्क्रीनवर दिसतो. यात नाव, नोंदणी क्रमांक, मोबाईल नंबर, मिळालेले हप्ते याची संपूर्ण माहिती दिलेली असते.

advertisement

जर Eligibility Details हा पर्याय दिसला, तर शेतकरी योजनेसाठी पात्र असल्याचे स्पष्ट होते. मात्र Ineligibility असे दिसल्यास तो शेतकरी अपात्र ठरतो आणि त्यामागील कारण देखील तिथे नमूद केलेले असते.

मराठी बातम्या/कृषी/
मुख्यमंत्र्यांची घोषणा! नमो शेतकरीचे पैसे खात्यात जमा, तुम्हाला पैसे मिळाले का? 2 मिनिटांत चेक करा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल