फार्मर आयडीचे मुख्य उद्देश शेतकऱ्यांची ओळख निश्चित करणे हा आहे. शेतकऱ्यांना एक युनिक आयडी देऊन त्यांची माहिती (जसे की नाव, गाव, जमिनीचे तपशील) डिजिटल स्वरूपात संग्रहित केली जाते. सरकारी योजनांचा लाभ जसे की PM-KISAN, पीक विमा, कर्ज, अनुदान इत्यादी योजनांचा लाभ थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पोहोचवण्यासाठी याचा लाभ होणार आहे. डिजिटल प्रणालीमुळे मध्यस्थांचा हस्तक्षेप कमी होतो आणि लाभ थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतो. शेतकऱ्यांचा डेटा (जमीन, पिके, उत्पन्न) एकत्रित करून शेतीविषयक धोरणे तयार करण्यासाठी उपयोग.
advertisement
आवश्यक कागदपत्रे:
आधार कार्ड, बँक खाते तपशील, जमिनीच्या मालकीचे दस्तऐवज (जसे की खाते उतारा, 7/12), मोबाइल नंबर आवश्यक आहे.
नोंदणी प्रक्रिया: ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने अर्ज केल्यानंतर, सरकार शेतकऱ्याची पडताळणी करते आणि फार्मर आयडी जारी करते.
फार्मर आयडीचे फायदे
सरकारी योजनांचा त्वरित लाभ, शेतीसंबंधी माहिती एका ठिकाणी उपलब्ध, डिजिटल रेकॉर्डमुळे कागदपत्रांची गरज कमी, शेतकऱ्यांना कर्ज, विमा आणि इतर सुविधा सहज मिळणे.





