पत्रामध्ये सरकारकडून आश्वासन कोणती?
शेतकरी कर्जमाफीसाठी 15 दिवसांत उच्चस्तरीय समिती नेमली जाईल. थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांच्या वसुलीला स्थगिती देणे आणि नवीन कर्ज देणे याबाबतची बैठक लावून निर्णय घेण्यात येईल. दिव्यांगांच्या मानधनामध्ये 30 जूनच्या बजेटमध्ये वाढ करण्यात येईल.उर्वरित मुद्द्यावर बैठक लावून मागण्या निकाली काढल्या जातील.
बच्चू कडू काय म्हणाले?
यावर बच्चू कडू म्हणाले की, आम्ही शेतकरी आणि दिव्यांग बांधवांसाठी आंदोलन करत आहोत. शेतकरी हितासाठी सर्वपक्षातले मला साथ देत आहेत.शेतकरी आणि दिव्यांग या ठिकाणी बसून आंदोलन केले आहे. 1500 रुपयांमध्ये त्यांची गरज भागत नाही. 8 दिवसांमध्ये शेतकऱ्यांना नव्याने कर्ज घ्यावे. तोडगा निघाला नाहीतर आम्ही 2 ऑक्टोबर रोजी मुंबईत मंत्रालयावर मोर्चा काढू. आमची ताकद दाखवून देऊ असा इशारा देखील बच्चू कडू यांनी दिले आहे.
advertisement
