योजनेचा उद्देश
या योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना अवकाळी पावसामुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानीपासून वाचवणे आहे. शेतकरी ताडपत्री वापरून पिकांवर आच्छादन करू शकतात, ज्यामुळे पाऊस, गारपीट किंवा वाऱ्यामुळे होणारे नुकसान कमी होते. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळतो आणि उत्पादनाची सुरक्षितता वाढते.
योजनेचे फायदे
पिकांचे संरक्षण होऊन अवकाळी पावसाचा फटका कमी होईल.
50 टक्के अनुदान मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचा खर्च कमी होईल.
advertisement
आर्थिक संकट टळून शेतकऱ्यांना मानसिक दिलासा मिळेल.
ताडपत्री बहुउपयोगी ठरेल – घरगुती कार्यक्रम, तात्पुरती शेड, गोदाम किंवा बाजारपेठेत स्टॉल लावण्यासाठीही वापर करता येईल.
पात्रता निकष
अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी आणि शेतकरी असणे आवश्यक.
आधार कार्ड असणे आणि ते बँक खात्याशी जोडलेले असणे अनिवार्य.
शेतकऱ्याच्या नावावर शेतीची जमीन असणे गरजेचे.
लहान, अल्पभूधारक, महिला, अनुसूचित जाती-जमातीतील (SC/ST) आणि दिव्यांग शेतकऱ्यांना प्राधान्य.
योजनेच्या अटी
यापूर्वी या योजनेचा लाभ घेतलेला शेतकरी पुन्हा अर्ज करू शकत नाही.
ताडपत्री केवळ अधिकृत विक्रेत्याकडूनच खरेदी करावी लागते.
खरेदी केलेल्या ताडपत्रीचे बीआयएस प्रमाणित पक्के बिल पुरावा म्हणून सादर करणे आवश्यक. अर्ज पंचायत समिती, गटविकास अधिकारी किंवा तालुका कृषी कार्यालयात जमा करावा. अर्ज मंजूर झाल्यानंतर अनुदान एका महिन्याच्या आत बँक खात्यात जमा केले जाईल.
आवश्यक कागदपत्रे
शेतकऱ्याचे ओळखपत्र व आधार कार्ड
शेतीच्या जमिनीची नोंद
जात प्रमाणपत्र (SC/ST साठी)
अपंगत्व प्रमाणपत्र (लागू असल्यास)
बँक पासबुकाची प्रत
ताडपत्री खरेदीचे बीआयएस प्रमाणित बिल
उत्पन्नाचा दाखला
अर्ज कुठे कराल?
या योजनेसाठी राज्य सरकारने ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ ही पद्धत लागू केली आहे. पात्र शेतकऱ्यांनी https://mahadbt.maharashtra.gov.in
या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावा किंवा थेट तालुका कृषी अधिकारी कार्यालयात अर्ज सादर करावा.