Lemon Rate: लिंबाचे दर घसरले! सोलापूर मार्केटमधून मोठं अपडेट, पिवळ्या लिंबाचा भाव काय?
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Patel Irfan Hassan
Last Updated:
Lemon Rate: पावसाळ्यात आवक वाढल्याने सोलापूर मार्केटमध्ये लिंबाच्या दरांत मोठी घसरण झाली आहे. पितृपक्षात लिंबू पुन्हा आंबट होण्याची शक्यता आहे.
सोलापूर: सोलापुरातील भाजीपाला मार्केटमधून महत्त्वाचं अपडेट आहे. गेल्या काही काळात भाववाढीमुळे सर्वसामान्यांसाठी आंबट झालेल्या लिंबाची चव आता बदलत आहे. सोलापूर मार्केटमध्ये लिंबाचे दर घसरत आहेत. पावसाळ्यात लिंबाची आवक वाढली असून हिरव्या आणि पिवळ्या लिंबाच्या दरांत मोठी घसरण झाली आहे. याबाबत सोलापुरातील व्यापारी अल्ताफ लिंबूवाले यांनी माहिती दिलीये.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत नवीन लिंबूची आवक सुरू झाली आहे. त्यामुळे लिंबाच्या दरात घसरण झाली आहे. हिरव्या लिंबूला 100 रुपये ते 170 दहा किलो या दराने भाव मिळत आहे. तर आकाराने मोठा आणि पिवळ्या लिंबूला 180 ते 250 रुपये दहा किलो दराने भाव मिळत आहे. पावसामुळे उत्पादनात वाढ झाल्याने बाजारात लिंबूची आवक वाढली आहे. पाऊस कमी झाला तर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत पुन्हा लिंबूची आवक वाढणार असून पुन्हा लिंबूचे दर घासणार असल्याची शक्यता व्यापारी अल्ताफ लिंबूवाले यांनी व्यक्त केली आहे.
advertisement
सध्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती अक्कलकोट, वडाळा, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर तसेच बार्शी येथून लिंबूची आवक होत आहे. तर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत येणाऱ्या लिंबूची विक्री सोलापूर जिल्हात 50 टक्केपर्यंत होत असून उर्वरित लिंबू हा आंध्र प्रदेश तामिळनाडू, आग्रा, कर्नाटक, दिल्ली, जयपूर या ठिकाणी असलेल्या मोठ्या बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी पाठवला जात आहे.
advertisement
दरम्यान, शेतकऱ्यांनी लिंबूची तोडणी करून विक्रीसाठी बाजारात आणत असताना लिंबू आकाराने मोठा आणि तयार असावा. अजून चांगली वाढ न झालेला लिंबू तोडू नये. येत्या काळात पितृपक्ष असून तेव्हा लिंबाचे दर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे, असे लिंबू व्यापारी अल्ताफ यांनी सांगितले.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
September 06, 2025 10:12 AM IST
मराठी बातम्या/कृषी/
Lemon Rate: लिंबाचे दर घसरले! सोलापूर मार्केटमधून मोठं अपडेट, पिवळ्या लिंबाचा भाव काय?