Pune Market: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, पुण्यातील मार्केट यार्ड 2 दिवस बंद राहणार
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
Pune APMC Market: पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती पुढील 2 दिवस बंद राहणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीमाल विक्रीसाठी आणू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
पुणे: पुण्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीत पश्चिम महाराष्ट्रासह राज्यातून शेतीमाल विक्रीसाठी दाखल होत असतो. फळे आणि भाजीपाला मार्केटमध्ये मोठी उलाढाल होत असते. परंतु, पुढील 2 दिवस मार्केट यार्डातील फळे आणि भाजीपाला विभाग बंद राहणार आहे. शनिवारी (6 सप्टेंबर) रोजी साप्ताहिक सुट्टी आणि रविवारी (7 सप्टेंबर) रोजी अनंत चतुर्दशीचा दुसरा दिवस असल्याने बंद राहणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या काळात माल विक्रीस आणू नये असे आवाहन बाजार समिती प्रशासनाने केले आहे.
दरवर्षी गणेशोत्सव संपल्यानंतर अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी पुणे मार्केट यार्डातील फळे, भाजीपाला आणि फुले विभागा बंद असतो. त्यानुसार यंदा रविवारी बंद राहणार आहे. फळे, भाजीपाला विभागाला शनिवारी साप्ताहिक सुट्टी असते. त्यामुळे हे दोन्ही विभाग शनिवारी बंद राहतील. तर शनिवारी अनंत चतुर्दशीला फुले विभाग सुरू राहणार आहे.
advertisement
दरम्यान, गूळ-भुसार विभागाला रविवारी साप्ताहिस सुट्टी असते. त्यामुळे रविवारी, 7 सप्टेंबर रोजी गूळ-भुसार विभाग नेहमीप्रमाणे बंद राहील. त्यामुळे रविवारी फळे, भाजीपाला, फुले आणि गूळ-भुसार असे सर्व विभाग बंद राहणार आहेत. शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी गैरसोय टाळण्यासाठी याची नोंद घ्यावी. तसेच माल मार्केटमध्ये आणू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
September 06, 2025 9:18 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune Market: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, पुण्यातील मार्केट यार्ड 2 दिवस बंद राहणार